SSC GD Constable Recruitment 2021 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय निमलष्करी पोलीस दलामध्ये बंपर 55915 कॉन्स्टेबल पदांची भरती ; दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ( SSC GD Constable Recruitment 2021) केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), सशस्त सीमा बल (SSB),नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (NIA ) आणि सचिवालय सुरक्षा बल (SSF)आसाम रायफल्समधील भरती प्रक्रियेबाबत 25 मार्चला अधिकृत घोषणा होणार आहे. SSC GD Constable Recruitment 2021 : Recruitment of Bumper 55915 Constables in Central Paramilitary Police Force from Staff Selection Commission

भरतीसाठी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. या भरतीसाठी 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला संगणक-आधारित पद्धतीनं परीक्षा होईल. एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2021 साठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावेत.

उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे (आवश्यक) ज्या उमेदवारांनी एसएससी जीडी कॉन्स्टेबल भर्ती 2021 साठी यशस्वीरित्या अर्ज केले आहेत त्यांना अनुसूचित संगणक-आधारित एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा 02 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत मागविण्यात येतील. उमदेवार https://ssc.nic.in/SSCFileServer/Portal Management/UploadedFile या लिकंवर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 55915 जागांवर भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये 47582 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 8333 जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 2018 मध्ये 60210 मध्ये पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्याचा निकाल जानेवारी 2021 मध्ये जाहीर झाला होता.

जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 21700-69100 इतक वेतन दिलं जाते. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून त्याचं वय 18 ते 23 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न विचारले जातात. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी आहे. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.

SSC GD Constable Recruitment 2021 : Recruitment of Bumper 55915 Constables in Central Paramilitary Police Force from Staff Selection Commission

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*