विशेष प्रतिनिधी
मुंबई: औरंगाबादचं नामांतर करण्यात 30 वर्ष फुकट घालवण्याला आणि मुंबईकरांना प्रत्येक निवडणुकीत चांगले रस्ते, शाळा, बगीचे देऊ, असे आश्वासन देऊन वेळकाढूपणा करण्याला टाईमपास म्हणतात, अशा शब्दांत महााराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.Spending 30 years free in renaming Aurangabad time pass MNS responds to Aditya Thackeray statement
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) म्हणजे टाईमपास पक्ष आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला होता. आता शिवसेनेकडून मनसेचा टाईमपास टोळी असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद रंगला आहे.
मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत रोखठोक उत्तर देत टाईमपास म्हणजे काय असतो, हे सांगितले आहे. औरंगाबादचं नामांतर करण्यात 30 वर्ष फुकट घालवण्याला आणि मुंबईकरांना प्रत्येक निवडणुकीत चांगले रस्ते, शाळा, बगीचे देऊ, असे आश्वासन देऊन वेळकाढूपणा करण्याला टाईमपास म्हणतात.
किंबहुना, करोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते… याला म्हणतात, टाइमपास!
मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग काम करत आहे. ही वीरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.