लवकरच देशात कुठूनही करता येईल मतदान, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे मोठे पाऊल

Soon voting can be done from anywhere in the country, a big step by the Election Commission to increase the turnout

आपल्या कुटूंबापासून दूर इतर शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना निवडणुकीत मतदान करण्यासाठी यापुढे घरी जाण्याची आवश्यकता राहणार नाही. निवडणूक आयोग लवकरच कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी एका महत्त्वाच्या योजनेवर काम करत आहे. Soon voting can be done from anywhere in the country, a big step by the Election Commission to increase the turnout


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आपल्या कुटूंबापासून दूर इतर शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना निवडणुकीत मतदान करण्यासाठी यापुढे घरी जाण्याची आवश्यकता राहणार नाही. निवडणूक आयोग लवकरच कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी एका महत्त्वाच्या योजनेवर काम करत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, निवडणूक आयोग देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर मतदानाची योजना सुरू करण्याचे काम करत आहे. रिमोट मतदान प्रकल्पावर मॉक ट्रायलदेखील सुरू होईल.मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, “आम्ही आयआयटी मद्रास आणि इतर संस्थांच्या सहकार्याने दूरस्थ मतदान प्रकल्पांवर संशोधन सुरू केले आहे. यात प्रगती होत आहे.”

प्रत्येक निवडणुकीत असे हजारो मतदार आहेत जे भौगोलिक अडचणींमुळे मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. अनेक मतदारांना नोकरी, शिक्षण, उपचार किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे दूर राहत असल्याने मतदानापासून वंचित राहावे लागत होते.

Soon voting can be done from anywhere in the country, a big step by the Election Commission to increase the turnout

दूरस्थ मतदान प्रकल्प अशाच मतदारांना आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यात मदत करणार आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार, मतदानासाठी मतदान केंद्राला भेट देण्याची गरज असलेल्या परदेशी मतदारांसाठी पोस्टल बॅलेट सुविधा सुरू करण्याचा विचारही निवडणूक आयोग विचार करत आहे.

Soon voting can be done from anywhere in the country, a big step by the Election Commission to increase the turnout

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था