कर्मभूमी महाराष्ट्राला जन्मभूमीपेक्षा जास्त महत्व, बिहारी म्हणणाऱ्याना सोनू सूदचे उत्तर

लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना मदत करणाऱ्याना शिवसेनेने बिहारी म्हणून हिणवले होते. बिहार विधानसभांच्या पार्श्वभूमीवर सोनू मदत करत असल्याचा आरोप केला जात होता. या सगळ्यांना सोनूने उत्तर दिले आहे. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. मी जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीला अधिक महत्व देतो. मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, असे सोनूने म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना मदत करणाºयांना शिवसेनेने बिहारी म्हणून हिणवले होते. बिहार विधानसभांच्या पार्श्वभूमीवर सोनू मदत करत असल्याचा आरोप केला जात होता.Sonu Sood’s says Karmabhoomi Maharashtra more important than Janmabhoomi

या सगळ्यांना सोनूने उत्तर दिले आहे. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. मी जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीला अधिक महत्व देतो. मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, असे सोनूने म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने प्रतिकूल परिस्थितीत त्यानं शेकडो लोकांना मदत केली.अनेक मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. मात्र इतकी मदत करुनही शिवसेनेसारखी काही मंडळी प्रांतवादाचा मुद्दा उकरुन त्याच्यावर टीका करत होते. परंतु या टीकाकारांना आता सोनूनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सोनू म्हणाला, मी गेली 25 वर्ष महाराष्ट्रात राहतोय. या राज्याने मला प्रसिद्धी, पैसा, मान सन्मान बरंच काही दिलं. ही माझी जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे. या कर्मभूमीचा मला अभिमान आहे. मी जन्मभूमीपेक्षा अधिक महत्व माझ्या कर्मभूमीला देतो. कारण या भूमीमुळंच आज मला माझी ओळख मिळाली.

मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. सुपरस्टार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मी इथे आलो होतो. अर्थात मी सुपरस्टार नाही झालो पण प्रसिद्ध मात्र नक्कीच झालो. मुंबईच्या लोकल ट्रेननं मी फिरायचो. चर्चगेट ते बोरिवली दरम्यान येणारं प्रत्येक स्टेशन मला ठाऊक आहे. कारण या प्रवासातच माझ्या करिअरची खरी सुरुवात झाली होती, असे सोनूने सांगितले.

Sonu Sood’s says Karmabhoomi Maharashtra more important than Janmabhoomi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*