काँग्रेस – मोदी सरकार आमने – सामने; पेट्रोल दरवाढीला ओपेक जबाबदार; सरकारचा दावा; आधी दरवाढ रोखा, सोनियांचे पंतप्रधानांना खरमरीत पत्र


वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  पेट्रोल – डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीवरून काँग्रेस – भाजप आज उघडपणे आमने-सामने आले. पेट्रोल दरवाढीची जबाबदारी ऑइल प्रोड्यूसिंग कंट्रीज अर्थात ओपेकची आहे. त्यांनी जादा नफा कमविण्यासाठी तेल उत्पादन घटवले आहे, असा खुलासा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला. तर काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांना कारणे सांगू नका, आधी पेट्रोलची दरवाढ रोखा, अशा आशयाचे खरमरीत पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले आहे. sonia gandhi writes letter to PM narendra modi to reduce fuel prices in india

सोनियांनी सरकारच्या आर्थिक धोरणाचे या पत्रातून वाभाडे काढले आहेत. पेट्रोल दरवाढीवर धर्मेंद्र प्रधानांचा खुलासा आल्यावर सोनियांनी लिहिलेल्या पत्राची बातमी काँग्रेसने जारी केली आहे.ओपेक देशांनी आणि ओपेक बाह्य तेल उत्पादक देशांनी सध्याच्या घडीचा लाभ उठविण्यासाठी तेल उत्पादन कमी केले आहे. त्यातून चढ्या किंमतीला ते आंतरराष्ट्रीय बाजारात तेल विकत आहेत. याचा ग्राहक देशांवर प्रतिकूल परिणाम होऊन पेट्रोल – डिझेलच्या किमती वाढत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी पेट्रोल – डिझेलवर जे कर लावले आहेत, त्या रकमेतून त्यातून मोठ्या प्रमाणावर त्यांच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे सरकारे कर कमी करायला मागे – पुढे पाहात आहेत, ही वस्तुस्थिती प्रधान यांनी लक्षात आणून दिली.

सोनियांनी काढलेत वाभाडे

सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वाभाडे काढले आहेत. कोरोना महामारीमुळे देशात बेरोजगारी वाढल्याकडे सरकारचे लक्ष नाही. लोकांचे रोजगार गेलेत, उत्पन्न घटले आहे. छोटे व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी या सगळ्या घटकांना आर्थिक मंदीने ग्रासले आहे. त्यातून वर त्यांना पेट्रोल – डिजेल आणि गॅस दरवाढीचा बोजा सहन करावा लागतो आहे.

अशा वेळी पंतप्रधानांनी वेळ न दवडता त्वरित पेट्रोल – डिझेल आणि गॅसची दरवाढ रोखावी, अन्यथा या देशातला गरीब, निम्न वर्ग आणि मध्यम वर्ग आर्थिकदृष्ट्या कोसळतील. आधीच शेतकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक झाला आहे. आता शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांचाही असंतोष उफाळून येईल, असा इशाराही सोनियांनी पत्रातून पंतप्रधानांना दिला आहे.

sonia gandhi writes letter to PM narendra modi to reduce fuel prices in india

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी