शिवसेनेबरोबर काँग्रेसने जावे, म्हणून मीच सोनियांना पटवले; पडवींनी तोडले “तारे”


  • मग बाकीचे नेते काय करत होते?

विशेष प्रतिनिधी

जळगाव : राजकारणात कोण कोणत्या विषयावरून श्रेय घेईल,आपली कशी पोळी भाजून घेईन,हे कुणी सांगूच शकत नाही, त्यात पुढारी तर माहिरच. कॉग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघातील नेते आणि आदिवासी मंत्री यांनी एक अजब दावा केला आहे. महाआघाडीची मोट बांधली जात असताना आपणच शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल सोनियांना (sonia gandhi latest news) सांगत त्यांना पटवले आणि सत्तास्थापनेस कॉग्रेस पक्ष तयार झाला,असे सांगत स्वतःचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

नंदुरबारमधील अक्कलकुवा अक्राणी हा मतदारसंघ दुर्गम असला तरी पाडवी यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसने उमेदवारी दिली. मात्र त्यांना या मतदारसंघात फक्त २७९ मतांची आघाडी मिळाली. भाजपच्या हिना गावीत यांचा पराभव केला. या यशामुळे मंत्रीपदाचे त्यांना गिफ्टही मिळाले आणि ते इतके हुरळून गेले की ते स्वतःची फुशारकी मारत काहीही सांगत सुटले आहे. काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना कॉग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी महाआघाडीचे सरकार आणण्यात आपण कशी महत्वाची भूमिका बजावली हेच जणू सांगून टाकत फुशारकी मारली. sonia gandhi latest news

सोनियांना अखेर पटावले

ते म्हणाले,राज्यात तीन पक्षाचे आघाडी सरकार स्थापन करतांना कॉग्रेसला शिवसेनेसोबत जाण्यास अडचण निर्माण झाली होती. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाचे सरकार स्थापनेस नकार दिला मात्र आपण स्वतः त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व शिवसेनेचा हिंदुत्ववाद पक्ष असल्याचे समजून सांगितले,त्यामुळेच शिवसेनेसोबत जाण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी मान्य केले. याशिवाय कॉग्रेस पक्ष पाच वर्षापासून विरोधात आहे. त्यामुळे पक्षाची ताकद कमी होत आहे. सत्तेत असतांना पक्षाला ताकद मिळते,हेही आपण सोनियांना सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. sonia gandhi latest news

दिग्गज नेत्यांना विचारले नाही,पाडवींचे ऐकले

कॉग्रेसमध्ये केंद्रात मंत्री पद भूषविलेले जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,मुकूल वासनिक,अहमद पटेल,अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात यासारखे एक नव्हे अनेक दिग्गज नेत्यांची यादी आहे, यातील अनेकज सोनिया,राहुल यांच्या जवळचे आहेत आणि ते दिल्लीत कायम असतात, असे असतांना यापैकी कुणाचेही सोनियांनी ऐकले नाही, फक्त पाडवी यांचेच ऐकले आणि सोनिया महाआघाडीत येण्यास तयार झाल्या. हे पाडवी यांचे वक्तव्य काहीसे हास्यास्पद वाटते. त्यांनी सोनियांनी कसे पटवले याबाबत मारलेली फुशारकी,सोडलेली पुडी किती फसवी आहे हे कुणालाही पटेल.

sonia gandhi latest news

वर्षानुवर्षे दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या अनेक कॉग्रेस नेत्यांना सोनिया,राहुल जुमानत नाही तर पाडवी हे किस झाडकी पत्ती, पण कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पाडवी यांनी उचलली जीभ आणि लावली टाळूला… अहो पाडवी साहेब खोटं तरी किती बोलावं, यालाही काही प्रमाण असतं, अशी भावना कॉग्रेस कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये झाली तर नवलच म्हणता येईल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती