स्वातंत्र्यवीरांबाबत इंदिरा गांधी यांनी काय लिहिले होते याचे उत्तर सोनिया गांधींकडे आहे का? सुब्रमण्यम स्वामी यांचा सवाल


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना हे काय लिहिलं आहे? याचं टीडीकेकडे (काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून केलेला शब्दप्रयोग) उत्तर आहे का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. (sonia gandhi latest news)


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना हे काय लिहिलं आहे? याचं टीडीकेकडे (काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून केलेला शब्दप्रयोग) उत्तर आहे का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.sonia gandhi latest news

स्वामी यांनी इंदिरा गांधी यांचे एक पत्र ट्विट केले आहे. या पत्रावर सुरुवातीलाच भारताचे पंतप्रधान असा उल्लेख आहे. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांचं नाव आणि स्वाक्षरीही आहे.

त्यावर २० मे १९८० अशी तारीख आहे. या पत्रात म्हटलेलं आहे की, मला ८ मे १९८० रोजी आपले पत्र मिळालं. ब्रिटिश सरकारविरुद्ध वीर सावरकर यांनी दाखवलेल्या धाडसाचं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात वेगळं महत्त्व आहे. भारताच्या या असामान्य पुत्राची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करते.

राहूल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करत असतात. सावरकरांनी कारागृहातून सुटण्यासाठी इंग्रज सरकारची माफी मागितली होती, असा आरोप त्यांनी केला होता. रेप इन इंडिया या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली होती. यावर उत्तर देताना माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही, असे राहूल गांधी यांनी म्हटले होते.

sonia gandhi latest news

त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या आजी आणि कॉंग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पत्र ट्विट केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था