लष्कराकडूनच सैनिकांना मिळणार पदकरुपी गौरव, १७ लाख पदके विकत घेण्यासाठी केला करार

सैनिकांना आता पदकरुपी गौरव हा लष्कराकडूनच मिळणार आहे. बाजारातून विकत घेण्याची गरज नाही. त्यासाठी लष्कराने तब्बल १७ लाख पदके विकत घेण्यासाठी करार केला आहे. Soldiers will get medal honors from the army, an agreement was reached to buy 17 lakh medals


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सैनिकांना आता पदकरुपी गौरव हा लष्कराकडूनच मिळणार आहे. बाजारातून विकत घेण्याची गरज नाही. त्यासाठी लष्कराने तब्बल १७ लाख पदके विकत घेण्यासाठी करार केला आहे.

पदक मिळवणे हे कोणत्याही सैनिकासाठी गौरवास्पद गोष्ट असते. मात्र पात्र भारतीय जवानांना आपले पदक मिळवण्यासाठी १०-१० वर्षांची प्रतिक्षा करावी लागते. या कारणामुळे शूर सैनिकांना पदकाच्या प्रतिकृतीवरच समाधान मानावे लागत आहे. वषार्नुवर्षे पदके मिळत नसल्याचे पाहून या सैनिकांना स्वत: दुकानात जाऊन पदकाची प्रतिकृती खरेदी करावी लागत आहे.शोर्यपदाबरोबरच लष्करात विविध प्रकारच्या कामगिरीने पदक देऊन सैनिकांचा गौरव केला जातो. परंतु, लष्कराकडे पदकेच उपलब्ध नसल्याने केवळ कागदावरच हा गौरव होतो. सैनिकांना बाजारातून आपला हा पदकरुपी गौरव विकत घ्यावा लागतो. यामुळे विविध प्रकारच्या १७ पदकांसाठी लष्कराने करार केला आहे.

लष्कराने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की संरक्षण मंत्रालयाने १७.२७ लाख लष्करी पदके खरेदी करण्यासाठी करार केला आहे. यामुळे दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटणार आहे.
त्यामुळे विविध प्रकारच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी पदक देऊन सैनिकांचा गौरव करणे लष्कराला शक्य होणार आहे. या पदकाच्या प्रतिकृती हैदराबाद, सिकंदराबादच्या मेहदीपटनम आणि गोवळकोंडा अशा ठिकाणी खरेदी केल्या जातात. या प्रतिकृतींना ‘टेलर कॉपी’ म्हटले जाते.

लाल बाजाराच्या रजिमेंटल मार्केटमध्ये या टेलर कॉपी ४० ते १८० रुपयांना मिळतात. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शौर्य पुरस्कार सैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागू शकतो. पदक आणि बॅजसह संपूर्ण गणवेश खरेदी करण्यासाठी कमीतकमी २५०० रुपये लागतात. शौर्य पुरस्कारांव्यतिरिक्त इतर सर्व पदकांची खरेदी-विक्री केली जाते.

Soldiers will get medal honors from the army, an agreement was reached to buy 17 lakh medals

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*