स्मृति इराणी म्हणाल्या, पढती का नाम प्यारी, इसी में चली गई उम्र हमारी


अमेठीमध्ये कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृति इराणी मंत्री म्हणून अत्यंत कार्यक्षमतेने काम करत असतात. आपल्या मंत्रालयाबाबत सर्व अपडेट त्यांच्याकडे असतात. गाडीत बसून काम करत असतानाचा एक फोटो त्यांनी नुकताच शेअर केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की पढती का नाम प्यारी, इसी में चली गई उम्र हमारी. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कॉमेंटरही केल्या आहेत. Smriti Irani said, Padti ka naam pyari, isi mein chali gayi umar hamari


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेठीमध्ये कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृति इराणी मंत्री म्हणून अत्यंत कार्यक्षमतेने काम करत असतात. आपल्या मंत्रालयाबाबत सर्व अपडेट त्यांच्याकडे असतात. गाडीत बसून काम करत असतानाचा एक फोटो त्यांनी नुकताच शेअर केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की पढती का नाम प्यारी, इसी में चली गई उम्र हमारी. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कॉमेंटरही केल्या आहेत.स्मृति इराणी यांनी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या मास्क घालून गाडीत बसून काम करताना दिसत आहेत. स्मृती गाडीच्या खिडकीच्या बाजूच्या सीटवर बसून मांडीवर ठेवलेल्या कागदांवर काहीतरी लिहित आहेत. या फोटोसोबत त्यांनी कॉमेंट केली आहे की, कोण म्हणतं की होमवर्क फक्त शाळेत असतो. पढ़ती का नाम प्यारी. इसी में चली गई आधी उम्र हमारी. मात्र, अर्धीचा अर्थ मी अजून ५० वर्षांची झालेले नाही.

स्मृती यांच्या या फोटोवर अभिनेता सोनू सूदने कॉमेंट करताना म्हटले आहे की, पढ़ेगा इंडिया तभी तो बढ़ेगा इंडिया. काही दिवसांपूर्वी सुद्धा स्मृती यांनी घरासमोरील अंगणामधून आॅनलाइन माध्यमातून मिटींगमध्ये सहभागी झालेला स्वत:चा फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर एका युझरने स्मृती यांनी हवाई चप्पल घातल्याचे म्हटले होते यावर उत्तर देताना स्मृती यांनी, अरे २०० रुपयांवाली हवाई चप्पल आहे, आता ब्रॅण्ड विचारु नका फक्त, असं म्हटलं होतं.

Smriti Irani said, Padti ka naam pyari, isi mein chali gayi umar hamari

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती