प्रियंका गांधी यांच्या शरीरावरील तीळ मोजणाऱ्या बड्या नेत्याला स्मृती इराणींनी हाकलून लावले, २०-२५ हजार मतांचीही केली नाही पर्वा

किमान २० ते २५ हजार मते हातात असलेला कॉंग्रेसचा नेता भाजपामध्ये येण्यास तयार होता. चर्चा सुरू झाली आणि तो म्हणाला की मी कॉंग्रेसला इतक्या जवळून ओळखतो की प्रियंका गांधी यांच्या शरीरावर कोठे कोठे तीळ आहेत, हे देखील मला माहित आहे. हे वाक्य ऐकले आणि स्मृती इराणी यांनी त्याला चक्क हाकलून दिले. जो माणूस एका महिलेचा सन्मान करू शकत नाही त्याला मी माझ्यासोबत घेऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी मतांचीही पर्वा केली नाही. Smriti Irani fired a big leader who was measuring moles on Priyanka Gandhi’s body


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : किमान २० ते २५ हजार मते हातात असलेला कॉंग्रेसचा नेता भाजपामध्ये येण्यास तयार होता. चर्चा सुरू झाली आणि तो म्हणाला की मी कॉंग्रेसला इतक्या जवळून ओळखतो की प्रियंका गांधी यांच्या शरीरावर कोठे कोठे तीळ आहेत हे देखील मला माहित आहे. हे वाक्य ऐकले आणि स्मृती इराणी यांनी त्याला चक्क हाकलून दिले. जो माणूस एका महिलेचा सन्मान करू शकत नाही त्याला मी माझ्यासोबत घेऊ शकत नाही, असे सांगत इराणी यांनी मतांचीही पर्वा केली नाही.

अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांच्याशी कॉंटे की टक्कर होणार होती. किमान २० ते २५ हजार मते हातात असलेला एका कॉंग्रेसचा नेता भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास तयार होता. मात्र, या नेत्याने प्रियंका गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि संतापलेल्या स्मृती इराणी यांनी या नेत्याला अक्षरश: हाकलून दिले. अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला.ही सगळी कहाणी अमेठीसंघर्ष या पुस्तकात पत्रकार अनंत विजय यांनी शब्दबध्द केली आहे. या पुस्तकात एक किस्सा लेखकाने सांगितला आहे. २०१४ च्या निवडणुकीतही अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्याविरुध्द निवडणूक लढविली होती. परंतु, त्यावेळी त्या एक लाख मतांनी पराभूत झाल्या.

मात्र, तरीही त्या उमेद हरल्या नाहीत. अमेठी मतदारसंघात त्या काम करतच राहिल्या. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून कॉंग्रेसच्या नेत्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी प्रयत्न होत होते. यातच अमेठीतील शुक्ला परिवार हा कॉंग्रेसवर नाराज होता. येथील प्रतिष्ठित कुटुंब असलेल्या शुक्ला कुटुंबाचा अमेठीतील किमान २० ते २५ हजार मतांवर प्रभाव होता.

शुक्ला यांची अट होती की ते स्मृती इराणी यांच्या उपस्थितीतच भाजपामध्ये प्रवेश करतील. त्याप्रमाणे एके दिवशी स्मृती इराणी यांच्या अमेठी भेटीदरम्यान भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी शुक्लांची त्यांच्याशी भेट घालून दिली. या वेळी चर्चेत शुक्ला यांनी आपला येथील कॉंग्रेस पक्षावर कसा प्रभाव आहे याच्या बढाया मारायला सुरूवात केली.

येथील कॉंग्रेसला मी अगदी जवळून ओळखतो असे सांगताना शुक्ला म्हणाले की, मी गांधी परिवाराच्या अगदी जवळचा आहे. मी हे देखील सांगू शकतो की प्रियंका गांधी यांच्या शरीरावर कोठे कोठे तीळ आहेत. शुक्ला यांचे हे वक्तव्य ऐकले आणि स्मृती इराणी प्रचंड संतापल्या. त्यांनी शुक्ला यांना चक्क हाकलून दिले.

Smriti Irani fired a big leader who was measuring moles on Priyanka Gandhi’s body

भाजपाचे कार्यकर्ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की त्यांची चूक झाली. बढाया मारताना ते हे बोलून गेले. त्यांच्याकडे २० ते २५ हजार मते आहेत. राहुल गांधी यांच्याशी कॉंटे की टक्कर असल्याने आपल्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. मात्र, स्मृती इराणी म्हणाल्या की जो माणूस एका महिलेचा सन्मान करू शकत नाही त्याला मी माझ्यासोबत घेऊ शकत नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*