मंत्री रमेश जारकीहोळी आक्षेपार्ह चित्रफित प्रकरण बनतेय आव्हानात्मक, उद्योजकाच्या घरावर एसआयटीचा छापा

विशेष प्रतिनिधी

बंगळूर : कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी आक्षेपार्ह चित्रफित प्रकरणी वित्तपुरवठा केल्याच्या संशयावरून एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील एका उद्योजकाच्या घरावर छापा टाकला. परंतु उद्योजक घरात आढळून आला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातील सदस्यांची कसून चौकशी केली. SIT raids on industrialist residence regarding CD

या प्रकरणाचा तपास तीव्र करण्यात आला आहे. एसआयटी अधिकाऱ्यांनी बंगळूरच्या जेपीनगर येथे एका व्यावसायिकाच्या घरी छापा टाकला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांचा व्यावसायिकाशी संपर्क होता. या व्यावसायिकाने संशयितांना आर्थिक मदत देण्यासह सर्व व्यवस्था पुरविली होती. माहितीची पुष्टी झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी छापा टाकून दोन तासाहून अधिक काळ चौकशी केली.घरात कोणी उद्योजक नव्हता, त्यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की १० दिवसांपूर्वीच तो घर सोडून गेला आहे. सीसीटीव्ही फुटेजचादेखील पाहणी करण्यात येत आहे.

या प्रकरणात ज्या लोकांची नावे नोंदविली गेली आहेत, ते आपल्या राहण्याची जागा सतत बदलत आहेत. त्यांनी मोबाईलचा वापर करणेही बंद केले आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे अधिकाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. संशयितांसमवेत चित्रफितीतील महिलाही असल्याचे समजते. ते परराज्यात गेल्याच्या संशयावरून यापूर्वी शेजारच्या राज्यांना कळविण्यात आले आहे.

SIT raids on industrialist residence regarding CD

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*