सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू तिरंग्यासह सदभावना रॅली ऐक्यासाठी प्रयत्न


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली हरियाणा सीमेवरील सिंघू येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्यांनी आज सदभवना रॅली काढून शेतकऱ्यांचे ऐक्य टिकविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.Singhu border Sadbhavana rally with tricolor efforts for unity
शेतकऱ्यांनी अनेक टॅक्टर आणि दुचाकीवर तिरंगा फडकवत रॅली काढली. कुंडली-मानसेर-पालवाल राष्ट्रीय महामार्गावर 16 किलोमीटरपर्यंत ही रॅली काढली आहे. ही रॅली शेतकऱ्यांची एकजूट ठेवण्यासाठी आणि फूट पाडणाऱ्याविरोधात काढली आहेअसे शेतकरी नेते दलजीतसिंग डालेवाल, दर्शन पाल यांनी सांगितले. तिरंग्याचा सन्मान ठेवण्यासाठी आणि धार्मिक मुद्द्यावरून शेतकऱ्यांत फूट पडणाऱ्याना उत्तर देण्यासाठी रॅली काढली आहे, असे ते म्हणाले.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅकर परेडवेळी उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर 3 दिवसांनी ही रॅली काढली. त्यावेळी 394 पोलिस जखमी झाले होते. त्यानंतर शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

Singhu border Sadbhavana rally with tricolor efforts for unity

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती