सिंचन घोटाळ्याची ईडी चौकशी करणार? अजित पवार यांच्या अडचणीत होणार वाढ

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदभार्तील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट दिली. मात्र आता सक्तवसुली संचलनालय (इडी) सिंचन घोटाळ्याची चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील एक संशयित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदभार्तील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट दिली. मात्र आता सक्तवसुली संचलनालय (इडी) सिंचन घोटाळ्याची चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील एक संशयित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी विनंती करणाºया जनहित याचिकांवर अंतिम सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना या घोटाळ्याबाबत कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही, तसेच त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे शपथपत्र हायकोर्टात दाखल केले होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत घडलेल्या राजकीय नाट्याच्या वेळी अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत देवेंद्र फडणीवस यांच्यासोबत पहाटे पहाटे शपथविधी उरकला होता. यानंतर लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून न्यायालयात अजित पवार यांना क्लीनचिट देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते.
हा केवळ प्रशासकीय हयगय या स्वरूपातील असून या सिंचन घोटाळ्याची यापूर्वी चौकशी केलेल्या वडनेरे, वांढरे अथवा माधवराव चितळे समितीने अजित पवार यांना या घोटाळ्याकरिता जबाबदार धरले नव्हते.

त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी केवळ विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाचे सचिव, अवर सचिव यांच्यावरच आहे. त्याशिवाय राज्य सरकारच्या रूल्स ऑफ बिझनेसमध्ये संबंधीत खात्याच्या सचिवांनी कोणताही निर्णय घेण्याकरिता संबंधीत मंत्र्यांना माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी जलसंपदा खात्याच्या सचिवांवर ढकलली आहे.

मात्र, आता ईडीकडून या घोटाळ्यांची चौकशी होणार असल्याने अजित पवार गोत्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीकडून होणाऱ्या चौकशीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगलाच अनुभव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ यांना ईडीच्या कोठडीत सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ व्यतित करावा लागला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*