ममतांनी घेतला बदला ; शुभेंदूच्या वडिलांना महत्त्वाच्या पदावरून काढून टाकले


भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांना दिघा शंकरपूर विकास प्राधिकरण (डीएसडीए) चे अध्यक्ष या पदावरून काढून टाकण्यात आले आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता: कॉंग्रेसचे ज्येष्ठ खासदार व भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांना दिघा शंकरपूर विकास प्राधिकरण (डीएसडीए) च्या अध्यक्ष पदावरून हटविण्यात आले आहे .Shubhendu’s father was removed from an important post 

एका अधिकृत अधिसूचनेत ही माहिती समोर आली आहे. तृणमूल कॉंग्रेसमधील त्यांचे विरोधी मानले जाणारे आमदार अखिल गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


ममता बॅनर्जी या भारतातल्या “डोनाल्ड ट्रम्प”; पराभूत झाल्या तरी सत्तेची खुर्ची सोडणार नाहीत; भाजप नेते दिलीप घोष यांची टीका


गिरी यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, डीएसडीएचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. म्हणून त्यांना काढण्यात आले आहे. शिशिर अधिकारी सध्या पुर्व मेदिनीपुरात टीएमसीचे जिल्हाध्यक्ष आहेत. तृणमूल कॉंग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितले की डीएसडीए चे अध्यक्ष म्हणून काम करण्यात ते असमर्थ आहेत. ते म्हणाले, शिशिर दा एक अनुभवी नेते आहेत. कदाचित ते आजारी आहेत. 

शुभेंदु भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर टीएमसीवर सातत्याने हल्ले करत आहेत.तरीही शिशीर यांनी आपली मुले शुभेंदू आणि सौमेंदू यांच्याविरोधात एकही शब्द काढला नाही त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटले आहे. आता ते त्यांना पाहिजे ते करू शकतात.

Shubhendu’s father was removed from an important post

 गेल्या महिन्यात शुभेंदू भाजपमध्ये दाखल झाले त्यानंतर कांती नगरपालिका प्रशासकपदावरून काढून टाकल्यानंतर त्यांनी त्यांचा भाऊ सौमेंदु यांनाही पक्ष बदलण्यास मदत केली.असे आरोप तृणमुल कॉंग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केले आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती