जवानांना सर्वोत्तम शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार : श्रीपाद नाईक; दहा हजार बुलेट प्रूफ जॅकेट प्रदान

सीमेवरील जवानांना ‘सर्वोत्तम शस्त्रे आणि संरक्षणात्मक शस्त्रास्त्रे’ पुरवली जातील, असे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी सांगितले. लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्याकडे एका कार्यक्रमात जवानांसाठी 100,000 बुलेट प्रूफ जॅकेट प्रदान करण्यात आली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीमेवरील जवानांना ‘सर्वोत्तम शस्त्रे आणि संरक्षणात्मक शस्त्रास्त्रे’ पुरवली जातील, असे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी सांगितले.लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्याकडे एका कार्यक्रमात जवानांसाठी 100,000 बुलेट प्रूफ जॅकेट प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

Shripad Naik Says best weapons will Be supplyed soldiers; Provides ten thousand bulletproof jackets

नाईक म्हणाले की, ‘मोदी सरकारने सैनिकांच्या ऑपरेशनल सेफ्टीवर जास्त भर दिला आहे. शत्रूशी लढताना त्यांच्या ‘अनमोल जीवनाचे रक्षण’ करणे आद्य कर्तव्य आहे. सरकार सैनिकांना सर्वोत्तम शस्त्रे आणि संरक्षक कवच प्रदान करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देईल.’

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*