Shrikant Umrikar viral FB Post On HM Anil Deshmukh Corruption Allegations by Parambir Singh

महिन्याला फक्त । शंभरच कोटी । बाब आहे छोटी । ‘काका’ म्हणे

परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यावर आता विविध राजकीय नेत्यांबरोबरच, राजकीय अभ्यासक, साहित्यिकांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. औरंगाबाद येथील ज्येष्ठ कवी, राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर (shrikant Umrikar) यांनीही या प्रकरणावर आपल्या खास शैलीत भाष्य केले आहे. श्रीकांत उमरीकर यांनी आपल्या फेसबुक हँडलवरून हा उपहासात्मक अभंग पोस्ट केला आहे. अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या पत्राच्या प्रकरणावर मार्मिक भाष्यक करणारी श्रीकांत उमरीकर यांचीही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यावर आता विविध राजकीय नेत्यांबरोबरच, राजकीय अभ्यासक, साहित्यिकांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. औरंगाबाद येथील ज्येष्ठ कवी, राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर (shrikant umrikar) यांनीही या प्रकरणावर आपल्या खास शैलीत भाष्य केले आहे. श्रीकांत उमरीकर यांनी आपल्या फेसबुक हँडलवरून हा उपहासात्मक अभंग पोस्ट केला आहे. अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या पत्राच्या प्रकरणावर मार्मिक भाष्यक करणारी श्रीकांत उमरीकर यांचीही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

श्रीकांत उमरीकर यांची फेसबुक पोस्ट

परम स्फोटाचा । जाहला आवाज ।
हादरला आज । महाराष्ट्र ।।१।।
महिन्याला फक्त । शंभरच कोटी ।
बाब आहे छोटी । ‘काका’ म्हणे ।।२।।
शंभराचे वाटे । करताना तीन ।
कोण मारी पीन । दिल्लीतून ।।३।।
सिंहासनाखाली । लागला सुरूंग ।
दाखवी तुरूंग । देवेंद्र हा ।।४।।
राजकारण्यांनी । सोडलीय लाज ।
दिसे मज आज । ‘कांत” म्हणे ।।५।।

भाजपकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

माजी पोलीस आयुक्तांच्या या आरोपानंतर भारतीय जनता पक्षाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. रविवारी सकाळी 11.30च्या सुमारास दादर पूर्व (रेल्वे स्टेशन) येथील स्वामीनारायण मंदिराजवळ भाजप आंदोलन करणार आहे. गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते येथे जमून निदर्शने करतील.

फडणवीसांकडून देशमुखांच्या NIA चौकशीची मागणी

तत्पूर्वी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्र्यांवरील गंभीर आरोपांवर आम्ही केंद्र सरकारच्या एजन्सीकडून सखोल चौकशीची मागणी करत आहोत. जर केंद्र सरकार या गोष्टीस सहमत नसेल तर कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे. पत्रात केलेले आरोप पाहता गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बरखास्त करावे.

राज ठाकरेही कडाडले

भाजपनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केले की, ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र स्फोटक आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्वरित राजीनामा सादर करण्याची गरज आहे आणि त्याची उच्चस्तरीय सखोल चौकशी झाली पाहिजे.’

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंग यांनी असा दावा केला आहे की, अँटिलिया प्रकरणात अटक करण्यात आलेले अनिल देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांच्या या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*