संभाजीनगर नाव लिहिण्याची हिंमत दाखवाच; पण काँग्रेसलाही लिहायला भाग पाडा; फडणवीसांचे उध्दव ठाकरेंना आवाहन

संभाजीनगर नाव नुसते सीएमओच्या ट्विटर लिहून काय उपयोग?, तुम्ही तर ते नाव लिहाच पण काँग्रेसला तसे लिहायला भाग पाडून दाखवा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले. Show courage to write the name Sambhajinagar; But force Congress to write too; Fadnavis appeals to Uddhav Thackeray


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संभाजीनगर नाव नुसते सीएमओच्या ट्विटर लिहून काय उपयोग?, तुम्ही तर ते नाव लिहाच पण काँग्रेसला तसे लिहायला भाग पाडून दाखवा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले.सीएमओच्या ट्विटरवर संभाजीनगर हे नाव लिहिले त्यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिशेने टीकास्त्र सोडले. शहरांची नामांतरे हा महाविकास आघाडीचा अजेंडा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बजावले. महाविकास आघाडीत त्यावरून तणाव तयार झाला, त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरेंना वरील आव्हान दिले.

Show courage to write the name Sambhajinagar; But force Congress to write too; Fadnavis appeals to Uddhav Thackeray

फडणवीस म्हणाले, की नुसते सीएमओच्या ट्विटरवर संभाजीनगर नाव लिहून काय होणार आहे, नामांतर करण्याची हिंमत दाखवा. तुम्ही तर ट्विटरवर संभाजीनगर नाव लिहाच पण तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांनाही संभाजीनगर हे नाव लिहायला भाग पाड़ा. तशी हिंमत दाखवा. नाहीतर तुम्ही एकट्याने नुसते संभाजीनगर हे नाव लिहून उपयोग काय?, असा सवालही फडणवीस यांनी केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*