Shopian Encounter Four terrorists eliminated in an encounter with security forces

Shopian Encounter: शोपियांतील चकमकीत लष्कर ए तोएबाचे चार दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरू

जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथे उडालेल्या चकमकीत (Shopian Encounter) सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. वृत्तसंस्थेनुसार, शोपियांच्या मनिहाल गावात चकमक उडाली. यात चार अतिरेकी ठार झाले. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, ठार झालेल्या अतिरेक्यांचा संबंध लष्कर-ए-तोएबाशी होता. 


विशेष प्रतिनिधी

शोपियां : जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथे उडालेल्या चकमकीत (Shopian Encounter) सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. वृत्तसंस्थेनुसार, शोपियांच्या मनिहाल गावात चकमक उडाली. यात चार अतिरेकी ठार झाले. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, ठार झालेल्या अतिरेक्यांचा संबंध लष्कर-ए-तोएबाशी होता. आर्मीस 34 आरआर, शोपियां पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा दलांना एक एके-47 आणि तीन पिस्तूल मिळाले.

तत्पूर्वी, जैशचा टॉप कमांडर सज्जाद अफगाणी गेल्या आठवड्यात रावलपोरा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. अफगाणीकडून ताब्यात घेतलेल्या 36 चिनी बनावटीच्या स्टीलच्या काडतुसांनी सुरक्षा दलाची झोप उडवली. त्यानंतर सुरक्षा दलाने त्यांची वाहने, बंकर आणि जवानांची बुलेट प्रूफिंग क्षमता आणखी मजबूत केली आहे. या स्टील बुलेटमध्ये सामान्य बुलेट-प्रूफ वाहने आणि जवानांच्या बुलेट प्रूफ जॅकेटला छेद करण्याची क्षमता असते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता जी वाहने व जवान तैनात केले जात आहेत, विशेषत: दक्षिण काश्मीरमध्ये त्यांच्या सुरक्षेत आणखी भर घालण्यात आली आहे. एके सिरीज रायफल्समध्ये सामान्यतः वापरल्या जाणार्‍या बुलेट्स आणि इतर स्फोटकांवर चिनी तंत्रज्ञानाद्वारे हार्ड स्टीलच्या कोरचा थर चढवला जातोय. यामुळे काडतुसांची लक्ष्य भेदण्याची क्षमता वाढते.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*