शिवसेनेला राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा धक्का, सोलापुरातून महेश कोठेंना पळविले


शिवसेनेला मुंबईपुरतेच सिमीत ठेवण्याची रणनिती राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखली आहे. त्यामुळे शिवसेनेचे अनेक नेते-कार्यकर्ते राष्ट्रवादी आपल्याकडे घेत आहे. सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश विष्णुपंत कोठे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ShivSena was once again pushed by NCP, Mahesh Kothe news


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : शिवसेनेला मुंबईपुरतीच सिमीत ठेवण्याची रणनितीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखली आहे. त्यामुळे शिवसेनेचे अनेक नेते-कार्यकर्ते राष्ट्रवादी आपल्याकडे घेत आहे.

सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश विष्णुपंत कोठे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठे हे राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत.महेश कोठे यांनी यापूर्वी २००९ साली सोलापूर शहर उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटिवर पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१४ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी झुंज देताना कोठे हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते.

कोठे यांच्या गळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची माळही घालण्यात आली होती. मात्र दोनवेळा पराभव होऊनही पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनी मागील २०१९ साली शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी हाती घेतली असता शिवसेनेने शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे बंडखोर म्हणून आपले भवितव्य अजमावून पाहिले. परंतु तिसऱ्यांदाही त्यांच्या पदरी निराशाच आली. एव्हाना, २०१७ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीत कोठे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ८ वरून थेट २१ वर वाढवून शहरात स्वत:सह शिवसेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला होता.

सोलापूर शहरात आतापर्यंत तुलनेत राष्ट्रवादीची ताकद नगण्य होती. परंतु आता शहरातही पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी सर्व जुन्या-नव्या मंडळींना एकत्र आणले जात आहे. कोठे हे राष्ट्रवादीत जात असल्यामुळे शिवसेनेत सावध प्रतिक्रिया उमटत आहे. महाविकास आघाडीची सत्ता टिकविताना शिवसेना व दोन्ही काँग्रेसमध्ये कोणीही एकमेकांचा पक्षाला खिंडार पाडायचा नाही, असे अलिखित ठरले आहे. तरीही शिवसेनेचे महेश कोठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात असताना राष्ट्रवादीने सोलापुरात शिवसेनेत लगेचच खिंडार पाडायचे नाही, असे ठरविल्याचे संकेत मिळत आहेत. कारण महेश कोठे हे तूर्त एकटेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

ShivSena was once again pushed by NCP, Mahesh Kothe news

शिवसेनेत त्यांच्या घरातीलच चार नगरसेवक आहेत. याशिवाय अन्य निकटचे नातेवाईक असलेले तीन नगरसेवक आहेत. तसेच त्यांच्यावर निष्ठा वाहिलेले अन्य सात नगरसेवक आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती