शिवसेना – राष्ट्रवादीचे मुंबईत गळ्यात गळे; ग्रामपंचायत निवडणूकीत मात्र एकमेकांमध्येच राडे; भिवंडीतील चार गावांमध्ये मारामाऱ्या, पेटवापेटवी, गोळीबार

एकीकडे राज्यात काही आमदार ग्रामपंचायत निवडणुकीत मांडवली करून बिनविरोध निवडणुका करताहेत तर दुसरीकडे शिवसेना – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडताहेत. ShivSena NCP clashesh Fighting, petrification, firing in four villages in Bhiwandi


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या “राजकीय सामंजस्या”तून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेत आणि मुंबईत “गळ्यात गळे” घालून बसलेत… पण ग्रामपंचायत निवडणूकीत याच दोन्ही पक्षांमध्ये फुल्ल राडे होताना दिसत आहेत. मुंबईजवळच्या भिवंडी तालुक्यातच याचा प्रत्यय आला. संरपंचपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर खुर्चा घेऊनच धावले.

एकीकडे राज्यात काही आमदार ग्रामपंचायत निवडणुकीत मांडवली करून बिनविरोध निवडणुका करताहेत तर दुसरीकडे शिवसेना – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडताहेत. भिवंडी तालुक्यातील 56 ग्रामपंच्यातीच्या निवडणुकांना राड्याने सुरुवात झाली आहे. तेथे सत्ताधारी राष्ट्रवादी आहे आणि प्रतिस्पर्धी शिवसेना आहे. त्यांचे कार्यकर्ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच भिडले.भिवंडी तालुक्यातील भादवड येथील निवडणूक कार्यालयात निंबवली गावातील राष्ट्रवादी आणि शिसेनेचे उमेदवार समोर येताच दोघांमध्ये चांगलाच राडा झाला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. सरपंचपदाच्या खुर्चीसाठी भांडत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्यांनी हल्ला केला.

गणेश गुळवी आणि प्रविण गुळवी अशी दोघा प्रतिस्पर्ध्यांची नावे आहेत. दोघांना एकच चिन्ह आल्यामुळे दोघांमध्ये वाद पेटला. कोणीही चिन्हासाठी माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी त्याचे रुपांतर खुर्च्या उचलून हाणामारीत झाले. विशेष म्हणजे, हे दोघेही नातेवाईक असून एकाच कुटुंबातील आहे.

ShivSena NCP clashesh Fighting, petrification, firing in four villages in Bhiwandi

ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाल्यापासून ही चौथी घटना आहे. पाहिली घटना गुंदवली इथे झाली. चौघांना मारहाण झाली होती त्यानंतर काल्हेरचे शिवसेनेचे शाखाप्रमुख यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. तर खारबाव येथ उमेदवाराची कार जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणि मंगळवारी तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये राडा घातला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*