नबाब मलिक यांचे मापात पाप.. परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे खच्चीकरण सुरू असल्याचा नगराध्यक्षांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

परभणी : मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेचे नेते गळ्यात गळे घालत असले तरी ग्रामीण भागात मात्र कार्यकर्ते एकमेंकांविरोधात लढत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मंत्रीही पध्दतशीरपणे राष्ट्रवादी बळ देत असल्याचा आरोप होत आहे. नबाब मलिक पालकमंत्री असलेल्या परभणी जिल्ह्यात त्यांच्याकडून निधी देताना आपपरभाव होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पूर्णाच्या नगराध्यक्षांनी केला आहे. Shivsena Nagarpalika Chairman alleges NCP Minister Nawab Malik over discrimination of fund distribution

पालकमंत्री नबाब मलिक यांच्याकडून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास आर्थिक बळ देणे तसेच जिल्हामध्ये शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप पूर्णेच्या नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नवाब मलीक यांनी पूर्णा नगर पालिकेला सुद्धा समप्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेतून निधीचे वितरण करणे गरजेचे होते. पण पूर्णा नगर पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. हे लक्षात घेऊन पालकमंत्री यांनी कमी निधीवर बोळवण केली आहे.जिल्ह्यातील वार्षिक योजनेत नगरोत्थान, दलीत वस्ती सुधार योजना, दलित्तेतर योजनेअंतर्गत कामांना 46 कोटी 15 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देखील दिली. दरम्यान पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिंतूर, पाथरी पालिकेला अनुक्रमे 11 कोटी 60 लाख, १० कोटी 60 लाख दिले. तर या तुलनेत शिवसेनेची सत्ता असलेल्या पूर्णा पालिकेस फक्त ३ कोटी 60 लाख रुपयांचा निधी दिला.

या जिल्ह्यात भाजप व भाजपचे समर्थन असणाऱ्यया नगर पालिकांना प्रत्येकी ७ ते ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असा आरोपही एकलारे यांनी केला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे. पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. तरीही पालकमंत्र्यांनी मुद्दामून केलेल्या या कृतीविरोधात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद देखील मागणार आहोत असल्याचेही सांगितले. वार्षिक योजनेतील निधी मंजुरीला स्थगिती द्यावी, नव्याने सुधारित समन्यायी पद्धतीने निधी वाटप करावे, अशी अपेक्षाही एकलारे यांनी व्यक्त केली आहे.

Shivsena Nagarpalika Chairman alleges NCP Minister Nawab Malik over discrimination of fund distribution

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*