…तर एखाद्या मित्रमंडळाकडे शिवसेनेपेक्षा जास्त कार्यकर्ते असतील, निलेश राणे यांची टीका


विधान परिषदेवर शिवसेनेच्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला आमदारकी दिल्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. एक वेळ अशी येईल की एखाद्या मित्रमंडळाकडे शिवसेनेपेक्षा जास्त कार्यकर्ते असतील,बअसे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषदेवर शिवसेनेच्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला आमदारकी दिल्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. एक वेळ अशी येईल की एखाद्या मित्रमंडळाकडे शिवसेनेपेक्षा जास्त कार्यकर्ते असतील, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष प्रत्येकी चार नावांची शिफारस करणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी उर्मिला यांच्याशी संवाद साधल्याचं बोललं जातं.

याबाबत नीलेश राणे म्हणाले, जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा. आंदोलनं करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ अशी येईल की एखाद्या मित्रमंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील.

उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिल्याने पक्षनिष्ठ पतिव्रता कोपर्यात बसून रडत आहे, नवी भटकभवानी मात्र विमानातून उडत आहे, अशी टीका केली जात आहे. कॉंग्रेसकडून गेल्या वेळी लोकसभा निवडणूक लढविणार्या उर्मिला मातोंडकर यांनी आत्तापर्यंत नेहमीच शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती