‘ईडी’ च्या रडारवर शिवसेनेचा नेता

हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणी पीएमसी बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. ShivSena leader on ED radar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत पाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणी पीएमसी बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.संबधित नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचे देखील सांगितले जात आहे.

ShivSena leader on ED radar

एचडीआयएल पीएमसी बँकेत घोटाळा करुन मिळवलेल्या निधीचा मोठा हिस्सा या राजकीय नेत्याला मिळाला आहे. त्यामुळे ईडीकडून आता या शिवसेना नेत्याची झाडाझडती घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*