शिवसेनेचे बेगडी हिंदूत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा जनतेसमोर, शरजील प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दुतोंडी आणि हिंदू विरोधी चेहरा जनतेला माहित होताच, पण शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.Shiv Sena’s crooked Hindutva and powerlessness again in front of the people, Chandrakant Patil’s attack on Shiv Sena over Sharjeel case


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दुतोंडी आणि हिंदू विरोधी चेहरा जनतेला माहित होताच, पण शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाºया शरजील उस्मानीच्या मुद्य्यावरून भाजपा आक्रमक झाला आहे. पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हिंदू समाजाबद्दल विखारी वक्तव्य करणाºया शरजील उस्मानीच्या अटकेसाठी राज्यात विविध ठिकाणी भारतीय युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले.

शरजीलच्या मुसक्या आवळून आणणार असे छातीठोकपणे सांगणा-या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियपणामुळे शरजीलला अद्याप अटक करण्यात आली नाही.शरजीलच्या अटकेसाठी प्रत्यक्षात या महाभकास आघाडी सरकारने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून शरजील उस्मानीला अटक झाल्यास त्याला त्वरित जामीन कसा मिळेल हेच या सरकाराचे प्राधान्य दिसत आहे.

या लबाड सरकारने शरजील उस्मानीला तात्काळ अटक न केल्यास भविष्यात भाजपा याहूनही तीव्र आंदोलन करेल! हिंदूंचा अपमान भाजपा कधीही सहन करणार नाही.

दरम्यान, पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने समाजात तेढ निर्माण करणारे विधान केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी उस्मानीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

Shiv Sena’s crooked Hindutva and powerlessness again in front of the people, Chandrakant Patil’s attack on Shiv Sena over Sharjeel case

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*