शिवसेना-राष्ट्रवादीचा गळ्यात गळा, कॉंग्रेसला मात्र टाळा, संजय राऊत यांची भूमिका


आगामी महापालिका निवडणुकांत महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्रितपणे लढणार का याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीचा गळ्यात गळा, कॉंग्रेसला मात्र टाळा, असेच धोरण राऊत यांनी मांडले आहे.  Shiv Sena-NCP will be together dont know about Congress, Sanjay Raut’s role


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांत महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्रितपणे लढणार का याबाबत उत्सुकता आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीचा गळ्यात गळा कॉंग्रेसला मात्र टाळा, असेच धोरण राऊत यांनी मांडले आहे.

पुणे महापालिका निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढवणार असल्याची घोषणा करताना राऊत म्हणाले की, आगामी आमचे सूत्र ठरलेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. यात काँग्रेसला कसे सामावून घेता येईल, त्या बद्दल चर्चा करु.महापालिकेत जास्त ताकद असलेल्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी स्थापन करावी. त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात येईल, असे ठरल्याते सांगताना राज्यातील बहुतांश महापालिकांत राष्ट्रवादीला धाकट्या भावाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद या महापालिकेत शिवसेनेची ताकद जास्त आहे. तर पुणे, पिंपरी-चिंचवड अशा काही महापालिकांत राष्ट्रवादीची निश्चितच ताकद जास्त आहे, असे सांगून राऊत म्हणाले की, येत्या काळात निवडणुका एकत्र लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यासोतबच इतर महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करू. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सत्ता काबीज करण्यासाठी एकत्र लढल्यास मदत होईल.महाविकास आघाडीचे एक शिल्पकार अशी संजय राऊत यांची ओळख असली तरी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच जास्त लळा असल्याचे विविध घटनांतून दिसून आले आहे. राऊत हे कोणत्याही पेचप्रसंगावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच भेटतात. कॉंग्रेसला विचारतही नाहीत, असे अनेकदा घडले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांत कॉंग्रेसला खड्यासारखे बाजुला ठेवण्याची शिवसेना-राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Shiv Sena-NCP will be together dont know about Congress, Sanjay Raut’s role

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी