शिवसेना खासदाराची जीभ घसरली, म्हणाले राज्यपालांची महाराष्ट्रात राहण्याची लायकी नाही

राज्यपालांना विमान नाकारण्यात आल्याच्या वादातून शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जीभ घसरली. राज्यपालांची महाराष्ट्रात राहण्याची लायकीच नाही अशी मुक्ताफळे पाटील यांनी उधळली आहेत. Shiv Sena MP’s tongue slipped, saying that the governor does not deserve to stay in Maharashtra


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यपालांना विमान नाकारण्यात आल्याच्या वादातून शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जीभ घसरली. राज्यपालांची महाराष्ट्रात राहण्याची लायकीच नाही अशी मुक्ताफळे पाटील यांनी उधळली आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी सरकारने आकसाने विमान नाकारले. त्यांना ऐनवेळी विमानातून उतरावे लागले. यावरून ठाकरे सरकारवर प्रचंड टिका होत आहे.मात्र खासदार पाटील यांनी राज्यपालांवरच टीका करुन मुक्ताफळे उधळली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, राज्यपालांची महाराष्ट्रात राहण्याची लायकी नाही. त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवले पाहिजे. राज्यपाल पदावरील व्यक्तीने निष्पक्ष काम केले पाहिजे. मात्र, ते भेदभावपूर्ण काम करत आहेत. ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहेत, त्यांचे वय झालं आहे, त्यांनी त्यांच्या राज्यात जाऊन काम केलेलं बरं.

राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवर ते कोणताही निर्णय घेत नसल्याने ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद वाढत चालला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डेहराडूनला जायचे होते. जेव्हा ते मुंबई विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रवासी विमानाने डेहराडून गाठले. राज्यपाल सचिवालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सरकारी विमान वापरण्यासाठी राज्य सरकारकडे २ फेब्रुवारीला परवानगी मागितली होती. मुख्यमंत्र्यांना सुद्धा याबाबत माहिती देण्यात आली होती. राज्यपाल उत्तराखंडला भेट देणार होते. मात्र, ठाकरे सरकारने राज्यापालांना सरकारी विमानातून प्रवासाची परवानगी नाकारली.

Shiv Sena MP’s tongue slipped, saying that the governor does not deserve to stay in Maharashtra

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*