मुंबईच्या आंदोलनाकडे आदित्यची पाठ; शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचे फ्लिपफ्लॉप; राऊत – सावंतांचा टिकैतांना “फोटोसेशन” पाठिंबा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता मुंबईत आझाद मैदानात झालेल्या आंदोलनाकडे आदित्य ठाकरे यांनी स्वतः पाठ फिरवली होती… पण आता शिवसेनेने आंदोलनावर फ्लिपफ्लॉप भूमिका घेत संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन खासदारांना गाझीपूर बॉर्डरवर पाठविले आहे. या दोन्ही खासदारांनी तेथे जाऊन शेतकरी नेत्यांबरोबर फोटोसेशन करून घेतले आहे.Shiv Sena leaders including party MPs Arvind Sawant and Sanjay Raut meet Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait at Ghazipu

मुंबईत ज्या दिवशी आंदोलन झाले, तेथे ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते. त्यांचे जोरदार भाषणही झाले. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देखील आंदोलनात सामील होण्याचे सांगण्यात आले होते. पण मुख्यमंत्री गेले नाहीत. त्याच दिवशी आंदोलनाऐवजी घरात बसून त्यांनी कल्याणच्या पत्री पूलाचे व्हर्च्युअल उद्घाटन करणे पसंत केले होते.मुख्यमंत्री घरात बसून उद्घाटन करत असताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये जाऊन पत्री पूलाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. इकडे आंदोलनात आदित्य सामील होण्याच्या माइकवरून घोषणा होत होत्या. पण नंतर उशीर झाल्याचे आणि ट्रॅफीक जॅमचे कारण सांगून आदित्य हे मुंबईतील आंदोलनाला गेले नाहीत. शिवसेनेचे मंत्रीही तिकडे फिरकले नाहीत.

आता मात्र, संजय राऊत आणि अरविंद सावंत या खासदारद्वयांना शिवसेना पक्षप्रमुखांनी गाझीपूर बॉर्डरवर जाऊन शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा जाहीर करून यायला सांगितले. त्यानुसार या दोन नेत्यांनी शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांच्यासमवेत फोटोसेशन करून पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यानंतर पत्रकारांना मोदी अहंकारी असल्याचा बाइट देऊन राऊत आणि सावंत तिथून निघून गेले आहेत.

Shiv Sena leaders including party MPs Arvind Sawant and Sanjay Raut meet Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait at Ghazipu

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*