शिवसेना म्हणजे नौटंकी सेना, देवेंद्र फडणवीस यांची टीका

शिवसेनेने आता औरंगाबादचे संभाजीनगर करा, असे म्हणायचे. म्हणजे त्यांना वाटते मतदार खूश होतील. काँग्रेसने ते करू नका, असे म्हणायचे, म्हणजे त्यांना वाटते त्यांचे मतदार खूश होतील. निवडणुका आल्यामुळे नुरा कुस्ती आता सुरू झाली आहे. दोघांनाही या बाबतीत कुठलेच गांभीर्य नाही. नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक आहे, सेना फक्त प्रस्ताव पाठवते भूमिका काही घेत नाही. ही सगळी नाटक कंपनी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी केली आहे. Shiv Sena is Nautanki Sena, Devendra Fadnavis critisizes


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेने आता औरंगाबादचे संभाजीनगर करा, असे म्हणायचे. म्हणजे त्यांना वाटते मतदार खूश होतील. काँग्रेसने ते करू नका असे म्हणायचे, म्हणजे त्यांना वाटते त्यांचे मतदार खूश होतील. निवडणुका आल्यामुळे नुरा कुस्ती आता सुरू झाली आहे.दोघांनाही या बाबतीत कुठलेच गांभीर्य नाही. नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक आहे, सेना फक्त प्रस्ताव पाठवते भूमिका काय घेत नाही, ही सगळी नाटक कंपनी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांंनी केली आहे.फडणवीस म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतराचे भाजपने 1995 पासून चार प्रस्ताव औरंगाबाद पालिकेत दिले होते. पण शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा शिवसेनेने कच खाल्ली.

Shiv Sena is Nautanki Sena, Devendra Fadnavis critisizes

मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा औरंगाबादला रस्त्याला पैसे दिले. पण महानगरपालिकेने ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता चालवूनही कुठलेही महत्त्वाचे काम न करता आल्याने अशा प्रकारची भाषा चाललेली आहे. निवडणुका आल्यानंतर या गोष्टी का आठवतात, असा प्रश्न फडणवीस यांनी केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*