विशेष प्रतिनिधी
लातूर : हिंदुत्वाबाबत भाजपची भूमिका ठाम आहे; पण सत्तेसाठी शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षाशी हातमिळवणी केली. राममंदिरापेक्षा त्यांना आता सत्ता महत्त्वाची वाटू लागली आहे. सत्तेसाठी त्यांचे हिंदुत्व पातळ झाल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.Shiv Sena Hindutva power is more important than Ram Mandir
राममंदिरासाठी शिवसेना आक्रमक होती. आता राममंदिराची उभारणी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिकडे गेलेही नाहीत. त्यांना राममंदिरापेक्षा सत्ता महत्त्वाची वाटू लागली आहे. हिंदुत्व हे कृतीतून दाखवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिरासाठी उत्तरप्रदेशाच्या उपमुख्यमंत्र्यांकडून 30 महिन्यांचे वेतन
राज्य शासनाने दारूवरील शुल्क माफ केले, बिल्डर्सचे शुल्क माफ केले; पण कोरोनाकाळातील जास्तीच्या वीजबिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. या शासनाला संवेदनाच नाहीत. या पुढील काळात सक्तीने वसुली केली तर ग्राहकांना वीजबिल भरू देणार नाही. जनतेसाठी जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा दरेकरांनी दिला.