बरे झाले, पंतप्रधानांनी अमेरिकेतल्या घटनेवर भाष्य केले, आता बहुतेक त्यांना पटले असावे, अब की बार ट्रम्प सरकार होत नाही म्हणून!!; शशी थरूर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

बरे झाले, पंतप्रधानांनी अमेरिकेतल्या हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य केले, आता बहुतेक त्यांना पटले असावे, अब की बार ट्रम्प सरकार सत्तेवर नाही म्हणून!!; अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. Shashi Tharoor takes a dig At Narendra Modi Over His Comment On US Incendent


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बरे झाले, पंतप्रधानांनी अमेरिकेतल्या हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य केले, आता बहुतेक त्यांना पटले असावे, अब की बार ट्रम्प सरकार सत्तेवर नाही म्हणून!!; अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील अंतिम निकाल जाहीर होताना हजारो ट्रम्प समर्थकांनी कॉपिटॉल हिलवर अभूतपूर्व गदारोळ आणि हिंसाचार माजविला. यात ४ जणांचा बळी गेला. अमेरिकेच्या लोकशाहीच्या इतिहासातील हा अभूतपूर्व हल्ला ठरला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले होते. अमेरिकेत शांततेतच सत्तांतर व्हावे, अशी भूमिका मांडली होती.

Shashi Tharoor takes a dig At Narendra Modi Over His Comment On US Incendent

त्यावरून शशी थरूर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अब की बार मोदी सरकारच्या धर्तीवर अमेरिकेतही अब की बार ट्रम्प सरकार ही घोषणा गाजली होती. मात्र ट्रम्प यांचा पराभव झाला. त्या घोषणेचा उल्लेख करून शरूर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली. हे बरे झाले. त्यांनी नव्या बायडेन प्रशासनाबरोबर काम करण्यास आता प्राधान्य द्यावे. बायडेन सत्तेवर आले असले तरी भारत – अमेरिका संबंधांमध्ये गुणात्मक फरक पडेल, असे वाटत नाही. दोन्ही देशांनी एकत्र येऊन लोकशाही बळकट करावी, असे मतही थरूर यांनी व्यक्त केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*