एल्गार परिषदेत शरजील उस्मानीच्या हिंदू समाजावर संतापजनक दुगाण्या; म्हणाला, आजचा हिंदू समाज पूर्ण सडलाय, तो मॉब लिंचिंग करतो!!


प्रतिनिधी

पुणे – ज्या एल्गार परिषदेवर भीमा कोरेगावची दंगल घडविल्याचा आरोप आहे, त्या एल्गार परिषदेची हेकडी अजून गेलेली नाही. २०२१ च्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात अनेक वक्त्यांनी गरळ ओकले… त्याचे विडिओ व्हायरल झाले आहेत.sharjeel usmani blames hindu society for mob lynching

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी म्होरक्या शरजिल उस्मानी हा त्यापैकीच एक. एल्गार परिषदेत त्याने हिंदू समाजाविरोधात गरळ ओकले. आजचा हिंदू समाज पूर्णपडे सडलाय. तो मॉब लिंचिंगमध्ये जोमाने उतरतो… एखाद्याला सहजपणे भोसकतो आणि घरी येऊन नॉर्मल जीवन जगतो, असली मुक्ताफळे शरजीलने उधळली आहेत.तो भाषण करतानाचा एक विडिओ व्हायरल झालाय. त्यात तो हिंदू समाजाविषयी अनर्गल भाषण करत असतानाच मागून बुकर पारितोषिक विजेती लेखिका अरूंधती रॉय व्यासपीठावर प्रवेश करताना दिसते आहे. याच अरूंधती रॉयने काश्मीरमध्ये सार्वमत घेऊन त्याला पाकिस्तानात जाऊ देण्यास किंवा स्वतंत्र होण्यास प्रोत्साहन देणारे वक्तव्य केले होते.

कालची एल्गार परिषद २०० लोकांच्या उपस्थितीत पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्रात पार पडली. त्यात मोदी सरकारवर राजकीय टीकेबरोबरच शरजीलसारख्या वक्त्यांनी हिंदू समाजाविरोधातही गरळ ओकली.

शरजील म्हणाला, हा सडलेला हिंदू समाज भर रेल्वेत, भर रस्त्यावर कोणाचीही भोसकून हत्या करतो. आणि घरी जाऊन शांतपणे आपल्या लोकांमध्ये आणि समाजामध्ये मिसळतो. त्याला कोणी अडवत नाही. टोकत नाही.

दुसऱ्या दिवशी तो तितक्याच निर्ढावलेपणाने मॉब लिंचिंगमध्ये सामील होऊन पुन्हा घरी जाऊन न जाणो कोणत्या पाण्याने हात धुतो, की त्याचे पाप नाहीसे होते.

शरजीलचे संपूर्ण हिंदू समाजावर गरळ ओकणारे भाषण व्हायरल झाल्यावर त्याच्यावर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत

sharjeel usmani blames hindu society for mob lynching.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती