शरजीलने हिंदूंविरूद्ध गरळ ओकली; त्याच्या विरूद्धचे धर्माला लक्ष्य करण्याचे कलम एफआयआरमधून वगळले;विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एल्गर परिषदेत हिंदूविरूद्ध गरळ ओकली त्या शरजील उस्मनीविरूद्धचे कलम ठाकरे – पवार सरकारने एफआयआरमधून वगळले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वरून सरकारवर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, Sharjeel hurled insults at Hindus devendra fadnavis statement

‘शरजील उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच./प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले?मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम 153 अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते.

खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार उद्धवजी असा सवाल फडणवीस यांनी केला.

Sharjeel hurled insults at Hindus devendra fadnavis statement

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*