विशेष प्रतिनिधी
मुंबई – उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर ठेवण्यात आलेली स्फोटके, त्याचा मास्टर माइंड आणि त्यानंतर झालेली मनसुख हिरेन यांची हत्या हे मूळ विषय आहेत. तुम्ही (पत्रकार) विषयाला बगल देऊ नका, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केले. sharad pawar took press conference twice, but CM uddhav thackeray keeps silence over sachin vaze – anil deshmukh issue
हे विधान म्हणजे बाण कोणाचा दिशेने सोडला आहे, याची चर्चा आता सोशल मीडियात जोरात सुरू आहे. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर दुपारी त्यांचे इनफ इज इनफ हे वाक्य सोशल मीडियात चर्चेचे ठरले… पण त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी मूळ विषय कोणते हे सांगितले… त्याकडे त्यावेळी दुर्लक्ष झाले. परंतु, आता सोशल मीडियात त्याच वक्तव्याची चर्चेने जोर पकडल्याचे दिसते आहे. परंतु, या सर्व प्रकरणात निर्णय ज्यांना घ्यायचा आहे, ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे गेले दोन दिवस संपूर्ण मौन बाळगून आहेत.
उध्दव ठाकरे यांनी या एकूणच प्रकरणाबाबत तसेच सचिन वाझे – गृहमंत्री अनिल देशमुख खंडणीखोरी या प्रकरणाबाबत एकही शब्द जाहीररित्या उच्चारलेला नाही. मुख्यमंत्री ठाकरे आज पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात विडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वर्षा बंगल्यावरून सहभागी झाले. गेल्या दोन – तीन दिवसांमधला हा त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्यांनी पाणी या विषयावर स्वाभाविकपणे भाष्य केले.
परंतु, अधिकृतरित्या किंवा ऑफ द रेकॉर्ड असे कोणतेच भाष्य त्यांनी सचिन वाझे – अनिल देशमुख किंवा अँटिलिया स्फोटके प्रकरणात केलेले नाही. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या दिल्लीतील घरी बैठक झाली. त्यांची दोन दिवस पत्रकार परिषद झाली. त्याच्या बातम्या आल्या. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र, एकूणच या प्रकरणावर एकही शब्द उच्चारलेला बाहेर आलेला नाही. त्यांचे हे मौन या प्रकरणांचे गूढ वाढवत आहे.