बारामतीत “स्थानिक” ठरवलेले सचिन वाझे दिल्लीत “राष्ट्रीय” झाले!!; पवार त्यांच्यावर दिल्लीत बोलले

  • सचिन वाझेंच्या ‘स्थानिक’ प्रकरणावर शरद पवार दिल्लीत वक्तव्य; अनिल देशमुख यांचे मात्र समर्थन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एका पोलिस निरिक्षकाचा परिणाम राज्य सरकारवर होणार नाही. सचिन वझे प्रकरणात केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत आणि त्यांना सहकार्य करणे हे महाविकास आघाडीचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. पण अनिल देशमुख यांचे त्यांनी समर्थन केले. Sharad pawar talks of “local” sachin vaze in delhi

“सचिन वाझे प्रकरण हे “स्थानिक” आहे, आपण त्यावर बोलणार नाही” अशी भूमिका शरद पवार यांनी नुकतीच बारामतीत घेतली होती. मात्र, काँग्रेसचे माजी नेते पी. सी. चाको यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या पत्रकार परिषदेत अखेर “स्थानिक” प्रश्नाचे उत्तर पवारांनी दिल्लीत दिले.



पवार म्हणाले, एखाद्या पोलिस निरीक्षकाचा परिणाम सरकारवर आणि राज्यावर होईल, असे मला वाटत नाही. सचिन वाझे प्रकरणी एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यामुळे त्याविषयी मी बोलणार नाही. मात्र, केंद्रीय यंत्रणांना सहकार्य करणे हे महाविकास आघाडीचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे त्यांना तपासात कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत, याकडेही लक्ष देणे राज्य सरकारचे काम आहे.

मात्र, ज्यांनी आपल्या अधिकारांचै गैरवापर केला अथवा चुकीचे काम केले त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम एनआयए करीत असेल तर महाविकास आघाडी पूर्ण सहकार्य करेन. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही कुरबुरी नाहीत काही समस्या असल्या तरीही त्या चर्चेतून सोडविल्या जातात, असेही पवार यावेळी म्हणाले.

Antilia Case: Why Sachin Vaze was arrested by NIA? Who is the mastermind of the plot?
Antilia Case: Why Sachin Vaze was arrested by NIA? Who is the mastermind of the plot?

Sharad pawar talks of “local” sachin vaze in delhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*