पवारांचा मुख्यमंत्र्यांना कात्रजचा घाट की शिवसेनेचा कृषि कायद्याला खरोखरच पाठिंबा?


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : मुंबईत निघालेल्या किसान मोर्चात शिवसेनेचा एकही बडा नेता फिरकला नाही. त्यामुळे कृषि कायद्याला शिवसेनेचा खरोखरच पाठिंबा आहे की शरद पवारांनी घटनात्मक पद असल्याने मुख्यमंत्र्यांनी येथे येऊ नये अशी भूमिका मांडून उध्दव ठाकरे यांना कात्रजचा घाट दाखविला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.sharad Pawar support agriculture law CM uddhav thackeray Shiv Sena

मुंबईतील मोर्चाला भारतीय जनता पक्ष वगळता राज्यातील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्याप्रमाणे आझाद मैदानात झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप असे सत्ताधारी आघाडीचे बडे नेतेही सहभागी झाले.. मात्र शिवसेनेचा एकही मंत्री या मोर्चात फिरकला नाही.आघाडीच्य काही नेत्यांकडून एकनाथ शिंदे ठाण्याहून निघाले आहेत, ते लवकरच आझाद मैदानात पोहोचणार आहेत, असे सांगण्यात येत होते. परंतु, शेवटपर्यंत शिंदे आले नाहीत. शिवसेनेचे प्रतिनिधीत्व नावापुरतं राहुल लोंढे नावाच्या युवा सेनेच्या पदाधिकाºयाने केले. त्यावरून शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कृषि कायद्यावरून शिवसेना सुरूवातीपासूनच संभ्रमात आहे. लोकसभेत नवी कृषि कायद्याचे विधेयक मांडण्यात आले त्यावेळी शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर अचानक शिवसेनेला उपरती आली आणि त्यांनी राज्यसभेत विधेयक मांडल्यावर वॉक आऊट केले. मात्र, विधेयकाला विरोध केला नाही. मुंबईतील मोर्चातही शिवसेना सहभागी झाली नाही.

काही दिवसांपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मुख्यमंत्री हे घटनात्मक पद आहे, अशी भूमिका राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. उध्दव ठाकरे यांनी मोेर्चात सहभागी होऊ नये असे त्यांनी सुचविले. त्याप्रमाणे ठाकरे आले नाहीत. मात्र, यामुळे शिवसेनेवर टिका करण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी राष्टÑवादी कॉँग्रेस आणि शिवसेना यांच्यात लढत आहे. पवारांच्या पुणे जिल्ह्यातही शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आघाडी असूनही राष्टÑवादीच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे पवारांनी जाणून बुजून उध्दव ठाकरे यांना मोर्चात येण्यापासून घटनात्मकतेचा मुद्दा काढला का? अशी चर्चा होत आहे.

दुसºया बाजुला उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असल्यान आले नाहीत हे मान्य केले तरी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची अनुपस्थितीही अनेकांना खटकली. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आझाद मैदानापासून तासाभराच्या अंतरावर मुंबई परिसरातच होते. कल्याणला पत्री पुलाचे उद्घाटन त्यांनी केले. त्यांच्याही गैरहजेरीत कृषि मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री सुभाष देसाई किंवा अगदी एखादा खासदारही मोर्चात आला नाही. त्यामुळे शिवसेनेला कृषि विधेयकाला विरोध करायचा नाही का? असा सवालही होऊ लागला आहे.

sharad Pawar support agriculture law CM uddhav thackeray Shiv Sena

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था