राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कटाचा मास्टरमाईंड आणि वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा बाप कोण? असा प्रश्न विचारावा, अशी मागणी भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कटाचा मास्टरमाईंड आणि वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा बाप कोण? असा प्रश्न विचारावा, अशी मागणी भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. Sharad Pawar should ask the Chief Minister who is the godfather of Sachin Waze, Prasad Lad’s criticism
प्रसाद लाड म्हणाले, एटीएसचे तपास अधिकारी शिवदीप लांडे यांना महाविकास आघाडी सरकार काम करू देत नाहीये. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकार खंडणीबाज की खंडणीबाद हा प्रश्न पडलाय. गृहखात्यात बदली करणं, पैसे घेणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा आहे.
जी आयुक्तांनी महिन्याला 100 कोटी म्हटलंय. यांनी राज्यामध्ये इतर काही घोळ केलाय का याचा तपास व्हायला हवा. या प्रकरणाची इडी चौकशी व्हायला हवी. 100 कोटींची ऊलाढाल आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि इतरांचा बाप कोण याची चौकशी व्हायला हवी.
लाड म्हणाले, एनआयएने मनसुख हिरेनचा तपास हाती घेतला त्यावेळी एटीएसने तपासाची सूत्रं हाती घेतली. शिवदिप लांडे सारख्या अधिकाऱ्याला सरकार काम करू देत नाहीये. त्यांना गृह खातं काम करू देत नाहीये. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे द्यायला हवं. मनसुखची हत्या झाली हे आमचे नेते वारंवार सांगत होते, पण मुख्यमंत्री तो लादेन आहे का असं म्हणत होते.