धनंजय मुंडे राष्ट्रवादीतच एकाकी; आता मुंडेंना “पवार इफेक्ट” समजला असेल; पवार घरच्या माणसाला संभाळून घेताहेत; पण त्याच्या साथीदाराला अद्दल घडवताहेत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राजकीय महत्त्वाकांक्षा आपल्या क्षमतेच्या आणि कक्षेच्या बाहेर जाऊन साध्य करण्याचा प्रयत्न केला की काय होते, हे आता धनंजय मुंडे यांच्या लक्षात आले असेल. काका गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय छत्रछायेत फारशी वाढ होत नाही, हे पाहून धनंजय मुंडे शरद पवारांना राजकीय फितूर झाले खरे… पण आता १० वर्षांनंतर त्यांना “पवार इफेक्ट” सामना करावा लागतोय. sharad pawar political effect on dhananjay munde

धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द बहरावी, म्हणून काही पवारांनी धनंजय मुंडे यांना मुंडे घराण्यातून फोडले नव्हते. तर स्वतःचे राजकीय हिशेब पूर्ण करण्यासाठी धनंजयची राजकीय महत्त्वाकांक्षा पवारांनी वापरून घेतली इतकेच…

आणि आता तर सुमारे वर्षभरापूर्वी अजितदादांची साथ दिल्याचे परिणाम पवार धनंजयला भोगायला लावताहेत. राष्ट्रवादीत खासदार अमोल कोल्हे सोडले तर त्यांच्या बाजूने उभे राहायला कोणी तयार नाही. उलट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या प्रेम प्रकरणातून राष्ट्रवादीचे हात झटकून टाकलेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीत एकाकी पडलेत.तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे प्रकरणात सॉफ्ट लाइन पकडत असल्याच्या बातम्या माध्यमांनी छापल्यात. यालाही एक राजकीय अर्थ आहेच… फडणवीस – धनंजय जुने मित्र… आणि वर्षभरापूर्वीचे अजितदादा – फडणवीसांमधील दूवा… म्हणून कदाचित फडणवीस धनंजयविषयी सॉफ्ट लाइन चालवत असावेत, अशी चर्चा आहे.

तिसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय मुंडे यांना नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला सांगून शरद पवारांच्या नैतिक राजकारणाची अफाट भलामण केली आहे. पवारांचे राजकारण नैतिक असल्याचे अजब तर्कट चंद्रकांतदादांनी लढविले आहे. चंद्रकांतदादांनी मुंडेच्या पक्षश्रेष्ठींकडे दाद मागितली आहे. पवारांनी नेहमीच नैतिकतेचे राजकारण केले आहे.

त्यांचे राजकारण शुद्ध मानले जाते. त्यांनी नेहमीच नैतिकतेला प्राधान्य दिले. त्यामुळे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील असा विश्वास आहे, असे विधान चंद्रकांतदादांनी करून पवारांचे राजकारण सर्टिफाय केले आहे.

sharad pawar political effect on dhananjay munde

चंद्रकांतदादांच्या या वक्तव्यालाही फडणवीस – धनंजय मैत्रीची राजकीय किनार असल्याचे मानले जाते. पण या सगळ्यात पवारांच्या राजकारणाचा “दीर्घ इफेक्ट” दिसलाय, हे मात्र खऱे. आधी भाजपच्या प्रभावी नेत्याचे घर फोडायचे… फुटलेल्याचा वापर त्याचे घर आणि त्याचा पक्षा आणखी पोखरण्यासाठी करवून घ्यायचा… नंतर आपलेच घर फुटल्यावर आपल्या घरातील व्यक्तीला संभाळून घ्यायचे… पण ज्याने त्या व्यक्तीला साथ दिली, त्याला अद्दल घडवून त्याचे राजकारण संपवायचे, हाच तो “पवार इफेक्ट” धनंजय मुंडेंना आता समजला असेल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी