बदल्यांच्या रॅकेटविरोधात सुबोध जैस्वाल, रश्मी शुक्लांच्या अहवालांकडे ठाकरे – पवारांनी का केले दुर्लक्ष…??; देवेंद्र फडणवीसांचा परखड सवाल

अशाप्रकारे सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अर्धसत्य सांगत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Sharad Pawar is half lying about Sachin Vaze reentry in police force


वृत्तसंस्था

मुंबई : परमबीर सिंग यांनी वाझेंना पुन्हा पोलीस दलात रुजू करून घेतलं हे खरं आहे. पण अशा प्रकारे सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अर्धसत्य सांगत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दिल्लीत आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांनीच सचिन वाजे यांना पुन्हा पोलीस दलात घेतले असे सांगितले होते. ,यावर नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, परमबीर सिंग यांनी वाझेंना पुन्हा पोलीस दलात रुजू करून घेतलं हे खरं आहे. पण अशा प्रकारे सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का? सरकारच्या आशीर्वादाशिवाय वाझेंना इतकं महत्त्वाचं पद मिळू शकत नाही. सरकारचा वरदहस्त असल्यानंच वाझेंकडे अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोपवला गेला.पोलीस दलातील, गृह विभागातील गैरप्रकारांवर बोलणारे परमबीर सिंग हे काही पहिले अधिकारी नाहीत. याआधी सुबोध जैस्वाल, रश्मी शुक्ला यांनीदेखील बदल्यांच्या रॅकेटबद्दल आवाज उठवला होता. पण ठाकरे सरकारनं त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. तशी दखल घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती, असे सांगून फडणवीस म्हणाले.

शरद पवारांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ऐकून मला आश्चर्य वाटले. ‘शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे सरकारनं काहीही केलं तरीही त्यांना बचाव करावा लागतो. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना परमबीर सिंग यांनी पुन्हा सेवेत घेतलं हे खरं आहे. पण हे अर्धसत्य आहे. शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं. परमबीर सिंग यांनी निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारनं आक्षेप का नोंदवला नाही? त्यावेळी सरकार झोपलं होतं का?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी पद सोडल्याशिवाय त्यांची निष्पक्षपणे चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा तातडीनं राजीनामा घेतला जावा. परमबीर सिंग यांनी त्यांच्याच पत्रात उल्लेख केलेलं पोलीस अधिकाऱ्यांसोबतच संभाषण हा महत्त्वाचा पुरावा आहे. हे चॅट त्यांना पदावरून दूर करण्यापूर्वीच आहे. त्यामुळे हा पुरावा अतिशय महत्त्वाचा आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाजे यांना मुंबईतील बारकडून दरमहा 100 कोटी हप्ता वसूल करण्याचे आदेश दिले होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे

Sharad Pawar is half lying about Sachin Vaze reentry in police force

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*