पवार मुंबईतील शेतकरी मोर्चात;आदित्य पत्री पुलाच्या उद्घाटनात ; मुख्यमंत्री घरात


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील शेतकरी मोर्चा आणि सभेत सर्वपक्षीय नेते एकत्र येणार असल्याची भाषा करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात ज्येष्ठ नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात शेतकरी मोर्चात, आदित्य ठाकरे पत्री पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घरात अशी आजची स्थिती होती. sharad pawar in farmers agitation in mumbai, aditya thackeray in kalyan, CM uddhav thackeray at home

केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस – डावे पक्ष एकत्र येण्याची गर्जना करण्यात आली होती. प्रत्यक्षात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचेच प्राबल्य मोर्चात दिसले. मुंबईत लाल वादळ नावाने मीडियाने बातम्या चालविल्या. मोर्चाला शरद पवारांनी संबोधित केल्याच्या बातम्या आल्या. त्यांनी मोदी सरकार जनताच खाली खेचेल, अशी टीका केली.

तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ठाण्यातील पत्री पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात अडकल्याने शेतकरी मोर्चाला आले नसल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातून विडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्री पुलाचे लोकार्पण केले. त्यामुळे ते घरातच असल्याचे स्पष्ट झाले.पवारांनी आझाद मैदानातून आणि मुख्यमंत्र्यांनी घरातून केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘मोदी सरकारने घटनेचा विचार न करता पायमल्ली करून कायदे केला, बहुमताच्या जोरावर कायदा केला. बहुमत डावलत कायदा केला तर जनता सत्ता उलथवून लावल्याशिवाय राहत नाही’, अशा शब्दांत पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

शेतकरी कायद्याविरोधात आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येनं शेतकरी जमले होते. ज्यांच्या हातात सत्ता आहे, पण त्यांना शेतकरी कष्टकरी किंमत नाही. शेतकरी रस्तावर बसला आहे पण पंतप्रधान मोदी यांनी साधी चौकशी केली का? पंजाबचा शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा आहे का? साधा शेतकरी आहे तो, त्याची विचारपुस सुद्धा करावीशी वाटली नाही का? असा संतप्त सवाल शरद पवार यांनी विचारला.

शेतकरी मोर्चाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला, पण घरात बसून. आदित्य ठाकरे मोर्चात गैरहजर दिसले. त्यावरून मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा पण आदित्य गैरहजर अशी चर्चा सुरू झाली. कल्याणमध्ये पत्रीपुलाच्या उद्घाटनात अडकल्याने ते गैरहजर राहिल्याचे बोलले गेले. मुख्यमंत्र्यांनी मोर्चाला पाठिंबा असल्याचे कळवले आहे. शेतकरी मोर्चाला आदित्य ठाकरे येणार होते मात्र पत्रीपूलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उशीर झाल्याने ते येणार नाहीत.

कल्याणातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पत्रीपुलाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन केले. त्यावेळी कल्याण डोंबिवलीतील विकासकामांवर भाष्य करतानाच त्यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. केंद्राच्या अनेक संस्थांकडे राज्याची कामे अडकून आहेत. एकीकडे अडथळ्यांची शर्यत करायची आणि मग आपली गती मोजायची, अशा शेलक्या शब्दांत ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

sharad pawar in farmers agitation in mumbai, aditya thackeray in kalyan, CM uddhav thackeray at home

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था