Sharad Pawar for UPA chairman; संजय राऊतांनी काँग्रेसला पुन्हा डिवचले; पवारांनी यूपीएचे नेतृत्त्व करावे, असे नाशकात म्हणाले!!

प्रतिनिधी

 नाशिक – काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थायत यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावेअशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मांडून काँग्रेसला डिवचले आहे. सोनिया गांधी सध्या यूपीएच्या अध्यक्षा आहेत. त्यांना बदलून पवारांची त्या जागी निवड करावी, असे राऊतांनी सूचविले आहे.  Sharad Pawar good option for UPA chairman, suggests sanjay raut in nashikनाशिक महापालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेचसोनिया गांधी यांनी आत्तापर्यंत युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावली असल्याचे मधाचे बोट देखील राऊतांनी काँग्रेसजनांना लावले.  

राऊत म्हणाले, की देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असे वाटत असेलतर युपीएचे नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावेआत्तापर्यंत सोनिया गांधींनी हे नेतृत्त्व उत्तम केले आहे. पण युपीएची ताकद सध्या कमी झाली आहे. सोनिया गांधींची प्रकृती बरी नसते. त्या आता सक्रिय राजकारणात फार दिसत नाहीत. देशात सध्या अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीतपरंतु, त्यांना भाजपविरोधात उभे राहण्याची इच्छा आहे. या पक्षांना युपीएमध्ये आणण्यासाठी शरद पवार हेच नाव मला दिसते, असे राऊत यांनी सांगितले. 

Sharad Pawar good option for UPA chairman, suggests sanjay raut in nashik

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*