शरद पवार दुट्टपी, आत्मचरित्रात एक आणि प्रत्यक्षात वेगळी भूमिका, भाजपा खासदाराची टीका

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात बारामतीतील माल देशात कुठंही विकला जावा अशी सुविधा असावी असे म्हटले. आत्मचरित्रात एक आणि प्रत्यक्षात वेगळे असे शरद पवार यांचे आचरण आहे. कृषी विधेयकाबाबत ते दुट्टपी भूमिका घेत आहेत, अशी टीका वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

वर्धा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात बारामतीतील माल देशात कुठंही विकला जावा अशी सुविधा असावी असे म्हटले. आत्मचरित्रात एक आणि प्रत्यक्षात वेगळे असे शरद पवार यांचे आचरण आहे. कृषी विधेयकाबाबत ते दुट्टपी भूमिका घेत आहेत, अशी टीका वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांनी केली आहे.

वर्धा येथे बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे की बारामतीतील माल देशात कुठेही विकला जावा अशी सुविधा असावी, असे त्यांना वाटत होते. पण त्यावेळी ते विधेयक पास करू शकले नाही. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना त्याचा माल देशात कुठेही विकण्याची सुविधा मिळवून दिली. व्यापाऱ्यांना हमीभावाच्या वरच्या दरानेच कृषी माल खरेदी करावा लागणार आहे. आत्मचरित्रात एक भूमिका आणि आता पवारांनी घेतलेली एक भूमिका यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे.

तडस म्हणाले, केवळ महाराष्ट्रात असलेली सत्ता टिकावण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध आहे. विरोधासाठी विरोध करायचा म्हणून हे दोन्ही पक्ष कायद्याला विरोध करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. कृषी विधेयकाला काँग्रेसचा विरोध आहे. राज्यातील सत्ता टिकावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनेदेखील या विधेयकाला विरोधाची भूमिका घेतली आहे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*