Paramavir letterbomb; अनिल देशमुखांचा राजकीय बळी घेण्यापूर्वी पवारांची सरकार वाचविण्याची कसरत!!; परमवीर सिंगांचे पत्र फडणवीसांवर पलटविण्याचा प्रयत्न!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – परमवीर सिंगांच्या लेटरबाँम्बच्या धमाक्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यापूर्वी, हे ठाकरे – पवार सरकार वाचविण्याची कसरत शरद पवार करीत असल्याचे आज दिल्लीतील प्रेस कॉन्फरन्समधून स्पष्ट झाले. sharad pawar diflects paramavir letter to devendra fadanavis, tried to save thackeray – pawar govt

मनसुख हिरेन – सचिन वाझे – परमवीर सिंग – अनिल देशमुख प्रकरणावर अखेर शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर मौन सोडून भाष्य केले. परमवीर सिंग यांच्या पत्राचा मुद्दा देवेद्र फडणवीसांवर पलटविण्याचा प्रयत्न पवारांनी केला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आल्यानंतर परमवीर सिंगांचे पत्र समोर आले आहे. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, असे पवार म्हणाले.परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. परमवीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणे मांडले होते. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितले नाही. पत्रकार परिषदेपूर्वीच माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे,” असे पवारांनी स्पष्ट केले.

सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन बदली करण्यात आलेल्या परमवीर सिंग यांचाच होता. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवले आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेले नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र समोर आले. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.

sharad pawar diflects paramavir letter to devendra fadanavis, tried to save thackeray – pawar govt

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*