पुन्हा “फिल” देणे – घेणे; परमवीर लेटरबाँम्ब – अनिल देशमुख या महाराष्ट्राच्या “स्थानिक” प्रश्नावर दिल्लीत पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : परमवीर सिंगांच्या लेटरबाँम्बनंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांचे पुन्हा “फिल” देणे – घेणे सुरू झाले आहे. सचिन वाझेंच्या प्रश्न “स्थानिक” आहे, असे सांगून बारामतीत प्रतिक्रिया नाकारणाऱ्या पवारांनी दिल्लीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वाझे प्रश्नावर उत्तरे दिली. वाझे प्रश्नाला “राष्ट्रीय” बनवून टाकले. sharad pawar calls meeting of NCP leaders in new delhi to discuss the matter of anil deshmukh

तसेच परमवीर सिंगांचे पत्र आणि गृहमंत्री अनिल देशमुखांचा संभाव्य राजीनामा या “स्थानिक” प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पवारांनी दिल्लीत आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असणार आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊतही पवारांची भेट घेणार आहेत. यातून पवारांना “राष्ट्रीय” पातळीवरचे राजकारण करण्याचा “फिल” घ्यायचा असल्याची महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.या सगळ्या प्रकारात शरद पवार अँक्शन मोडमध्ये आले असले, तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मात्र, शांत निरीक्षकाच्या भूमिकेतून संजय राऊतांकरवी मंत्र्यांना आपले पाय जमिनीवर आहेत का, हे तपासून पाहण्याचा सल्ला देत आहेत. प्रत्यक्षात हा सल्ला नसून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी इशारा असल्याचे मानले जात आहे.

पवारांच्या छायेतून बाहेर पडण्याची संधी

ठाकरे – पवार सरकारमधल्या मंत्र्यांवर शरद पवारांचे नियंत्रण आहे. मुख्यमंत्री त्यांनी बसवलेला आहे, हा फिल कायम राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शिवसेनेला देण्यात येतो. परमवीर सिंगांच्या लेटरबाँम्बनंतर हा फिल राष्ट्रवादीवर परतवण्याची संधी आली आहे. ती संधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेत आहेत, असे मानण्यात येत आहे.

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोडांचा राजकीय बळी घेतला. आता वेळ राष्ट्रवादीची आहे. अनिल देशमुखांचा राजकीय बळी देण्याशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला सूचित करत आहेत.

sharad pawar calls meeting of NCP leaders in new delhi to discuss the matter of anil deshmukh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*