बिहार कॉंग्रेसमध्ये बेबनाव? शक्तीसिंह गोहिल यांची राज्य प्रभारीपदावरून मुक्त करण्याची विनंती

नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवामुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या कॉंग्रेसच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिहार प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनी पक्षाच्या प्रभारी पदावरून मुक्त करावे, अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. Shaktisinh Gohil Request to release from state charge


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवामुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या कॉंग्रेसच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिहार प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनी पक्षाच्या प्रभारी पदावरून मुक्त करावे, अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. गतवर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

कॉंग्रेस नेते शक्तीसिंग गोहिल यांनी सांगितले की, “काही वैयक्तिक कारणांमुळे मी कॉंग्रेस हायकमांडला बिहार प्रभारी पदावरून मुक्त करावे आणि काही महिने दुसरी जबाबदारी देण्याची विनंती केली आहे.” गोहिल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “वैयक्तिक कारणास्तव मी कॉंग्रेस हायकमांडला विनंती केली आहे की, मला हलकी जबाबदारी द्यावी आणि बिहारच्या प्रभारीपदावरून मुक्त करावे.” गोहिल यांच्या या ट्वीटनंतर विविध चर्चांना ऊत आला आहे. बिहार काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीची चर्चा रंगू लागली आहे. पराभवानंतर पक्षाच्या संरचनेत आमूलाग्र बदलाचे संकेत होते.



दरम्यान, 2020 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 125 जागा जिंकून सरकार स्थापनेत यश मिळवले. भाजपाने 74 जागा जिंकल्या, तर नितीश कुमारी यांच्या पक्ष जनता दल युनायटेडने 43 जागा जिंकल्या होत्या. एनडीएचे घटक पक्ष विकासशील इन्सान पार्टी आणि हिंदुस्तानी आम मोर्चाला 4-4 जागा मिळाल्या होत्या.

Shaktisinh Gohil Request to release from state charge

दुसरीकडे, बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. महाआघाडीला एकूण 110 जागा जिंकता आल्या. यात राष्ट्रीय जनता दलाला 75 जागा, कॉंग्रेसला 19 आणि डाव्या पक्षांना 16 जागा मिळाल्या होत्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*