नाशिकमध्ये देहविक्री करणाऱ्या भगिनींचे श्रीराम मंदिर निधी संकलनात समर्पण


  • पतितपावन रामाविषयी श्रद्धेचे दर्शन!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमध्ये देहविक्री करणाऱ्या भगिनींनी देखील श्रीराम मंदिर निधीमध्ये मनोभावे समर्पण केले. आज भद्रकाली नगर येथील स्वयंसेवकांनी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीत जाऊन श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन केले. त्यांना यावेळी आलेला अनुभव हा अविस्मरणीय आहे.Sex workers in nashik donate for ram mandir in ayodhya

श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियायाविषयीची माहिती स्वयंसेवकांनी तिथे असलेल्या भगिनींना दिली. हा विषय समजावून घेतल्यावर सर्व महिलांनी यथाशक्ति समर्पण करण्याची इच्छा दर्शवली.या पुण्यकार्यात सहभागी करून घेतल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. इतर वेळी समाजाकडून हीन वागणूक मिळते, परंतु आज हा वेगळा सन्मान मिळाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मनातील प्रभू श्रीरामाविषयी असलेली श्रद्धा आणि निःस्वार्थ भाव याचे दर्शन घडले.

यावेळी निधी समर्पण करत असताना एक पत्रक चुकून खाली पडले. त्यावेळी एका महिलेने ते पत्रक उचलून नमस्कार केला आणि मग ते परत स्वयंसेवकांच्या हातात दिले. या मधून एक दिसते माणूस हा परिस्थितीमुळे अगतिक असतो. पण श्रद्धा या नेहमीच जिवंत असतात.

त्यामध्ये असलेल्या आणखी एका महिलेने समर्पण करताना एक वाक्य उद्गारले जे ऐकून कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले, “मला अयोध्येला जाता येईल का नाही माहिती नाही, पण तुम्ही दिलेला प्रभूश्री रामचंद्र यांचा फोटो हीच माझी अयोध्या आणि हाच माझा राम ! मी रोज याची पूजा करेन.”

Sex workers in nashik donate for ram mandir in ayodhya

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था