पर्यावरण रक्षणासाठी सात कलमी अजेंडा कमल हासनकडून जाहीर

तामिळनाडू विधानसभा निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून हसन यांनी सालेममध्ये अजेंडाचे अनावरण केले. ते म्हणाले की, उद्योग, शेती आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे. Seven-point agenda for environmental protection announced by Kamal Haasan


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : मक्कल नीधी मैयम (एमएनएम) चे संस्थापक आणि अभिनेता कमल हासन यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सात कलमी अजेंडा जाहीर केला.

तामिळनाडू विधानसभा निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून हसन यांनी सालेममध्ये अजेंडाचे अनावरण केले. ते म्हणाले की, उद्योग, शेती आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.

‘पर्यावरणावरण कार्यक्रमात परिपूर्ण अर्थव्यवस्था स्थापन करण्याचा उद्देश आहे. जेथे पाणी, प्लास्टिक, आणि ई कचरा याचा पुनर्वापर करणे आहे.प्लास्टिक नसलेल्या पर्यायांच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले आहे. बचतगटाना प्रोत्साहन देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट आहेत. भूगर्भातील पाण्याचे मोठा साठा करण्यासाठी कठोर भूजल नियमन राबविण्यात येईल. एरिस, थांगल, कानमाई आणि जलमार्ग यासारख्या संस्थांच्या संरक्षणासाठी वेटलँड नियमांत सुधारणा केली जाईल.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धर्तीवर औद्योगिक राज्यांसाठी राज्यव्यापी पर्यावरणीय अटलस विकसित करण्याचा विचारही आहे.

Seven-point agenda for environmental protection announced by Kamal Haasan

‘लोकल एरिया पर्यावरण समिती’ स्थापन केल्या जातील. इको-प्रणाल्यांचा आदर करण्याबाबत लोकांना वर्तणूक बदलण्यास प्रोत्साहित केले जाईल. हासन म्हणाले की राज्यात प्लास्टिक आणि कचरा आहे. तमिळनाडूच्या लोकांनी त्यावर तोडगा काढला पाहिजे. जलसंस्था दूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी, असेही ते म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*