अभिमानास्पद! भारतीय रेल्वेची कमाल, बनवली जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन तयार करून भारतीय रेल्वेने इतिहास रचला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, लाइफलाइन एक्स्प्रेस ही भारतातील एकमेव आणि जगातील अशी पहिलीच हॉस्पिटल रेल्वे आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वैद्यकीय मदत पोहोचवणे हे या रेल्वेचे मुख्य उद्दिष्ट आहे. serving patients free of cost The train is equipped with 2 modern operation

ट्रेनमधील हे पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या ट्रेनमध्ये रुग्णांच्या उपचारांसाठी संपूर्ण सुविधा आहेत. लाइफलाइन एक्स्प्रेस रुग्णांना मोफत उपचार देते. या ट्रेनमध्ये मूलभूत तांत्रिक सुविधा आहेत. ग्रामीण भागात चांगल्या उपचार सुविधा देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.ट्रेनमध्ये दोन आधुनिक ऑपरेशन थिएटरसुद्धा आहेत. याशिवाय मेडिकल स्टाफ रूम आणि पाच ऑपरेटिंग टेबल्ससह सर्व सुविधा या ट्रेनमध्ये आहेत. सध्या ही लाइफलाइन एक्सप्रेस ट्रेन आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे.

serving patients free of cost The train is equipped with 2 modern operation

भारतीय रेल्वे व इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये सात डबे आहेत. ही स्पेशल ट्रेन भारताच्या विविध भागांतून जाईल. कोरोना साथीच्या संकटकाळात हा उपक्रम सर्वात प्रभावी मानला जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*