Serial bomb blast near the house of BJP MP Arjun Singh in West Bengal, three people injured

पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, 3 जण जखमी

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणामध्ये भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घराजवळ एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटांमध्ये 3 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक मूल, एक तरुण आणि एक वयस्कर महिला यांचा समावेश आहे, त्यांना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. Serial bomb blast near the house of BJP MP Arjun Singh in West Bengal, three people injured


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणामध्ये भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घराजवळ एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटांमध्ये 3 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक मूल, एक तरुण आणि एक वयस्कर महिला यांचा समावेश आहे, त्यांना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जगदल मेघना येथे अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास दहापेक्षा जास्त क्रूड बॉम्ब फेकले. ही जागा बॅरकपूर येथील खासदार अर्जुन सिंह यांच्या घरापासून अगदी जवळ आहे. बॅरकपूर शहर पोलिसांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘टीव्ही 9’ला दिलेल्या मुलाखतीत खासदार अर्जुन सिंह यांनी स्वत:च्या घराजवळ बॉम्बने हल्ला झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. हल्लेखोर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा आरोप भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी केला. ते म्हणाले की, सुमारे 15-20 बॉम्ब स्फोट झाले आहेत. दरम्यान, आपण आपल्या घरी असून सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्जुन सिंह म्हणाले, “ज्या लोकांनी बॉम्बस्फोट घडवला त्यांच्याविरुद्ध आम्ही मागच्या दहा दिवसांपासून पोलिसांकडे तक्रारी करत आहोत. हे लोक अनेक दिवसांपासून बॉम्ब-पिस्तूल घेऊन फिरत होते, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आज त्यांनी तेच कृत्य केले ज्याचा आम्ही संशय होता. उद्या आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.”

टीएमसीकडून हिंसाचाराचे राजकारण : विजयवर्गीय

भाजपच्या खासदाराच्या घराजवळ बॉम्ब फेकल्याच्या घटनेवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले की, तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचाराचे राजकारण होत आहे. आचारसंहिता अस्तित्वात असूनही तेथे गुंड गोळीबार करत आहेत व बॉम्बस्फोट घडवत आहेत. निवडणूक आयोगाने याला इशारा म्हणून घ्यावे, अन्यथा मतदान शांततेत पार पडेल याची खात्री नाही.

Serial bomb blast near the house of BJP MP Arjun Singh in West Bengal, three people injured

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*