विशेष प्रतिनिधी
दिल्ली : केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेअर बाजारात तेजीचे आलेले उधाण अजूनही सुरूच आहे. शेअर बाजारात आज आणखी तेजी दिसून आली. ‘सेन्सेक्स’ने प्रथमच ५१,००० चा आकडा पार केला. ‘निफ्टी’नेही इतिहासात प्रथमच १५,००० अंशांचा टप्पा पार केला.Sensex crossed the 51,000 mark for the first time
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय क्षेत्रामध्ये सतत वाढ होत आहे. आज ‘पीएसयू बँक’ निर्देशांकात सुमारे ३.५ टक्क्यांनी वाढ झाली. स्टेट बँकेच्या तिमाही निकालानंतर जवळपास हा शेअर ११ टक्क्यांनी वाढला आहे.
आज ‘सेन्सेक्स’ने ५१,०७३ चा नवा विक्रम नोंदविला. कामकाज संपल्यानंतर ‘सेन्सेक्स’ ११७ अंशांनी वधारून ५०,७३२ च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर ‘निफ्टी’ही २९ अंशांच्या वाढीसह १४,९२४ च्या पातळीवर बंद झाला.