राहुल गांधींच्या वक्तव्यावर वरिष्ठ सैन्याधिकारी संतप्त, बेजबाबदारपणावर माफीनाम्याची मागणी


देशाच्या सुरक्षेसाठी सैन्याची गरज नाही या कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सैन्यदलातील निवृत्त वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्याकडून बेजबाबदारपणासाठी लष्कराकडे माफीनाम्याची मागणी केली आहे. Senior Army officials angry over Rahul Gandhi’s statement


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेसाठी सैन्याची गरज नाही या कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सैन्यदलातील निवृत्त वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्याकडून बेजबाबदारपणासाठी लष्कराकडे माफीनाम्याची मागणी केली आहे.

तामीळनाडू येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की देशातील शेतकरी, कामगार, श्रमिक मजबूत झाला तर सैन्याची गरज पडणार नाही. या अजब तर्कामागचे कारण मात्र त्यांनी सांगितले नाही. त्यावरून निवृत्त सैन्याधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत अपाल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून आम्हाला प्रचंड खेद झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे.माजी सैन्याधिकाऱ्यांनी याबाबत संयुक्त निवेदन काढले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही भारतीय शेतकरी, श्रमिक आणि मजुरांचा सन्मान करतो. आपल्या अर्थव्यवस्थेची ते ताकद आहेत. राष्ट्र निर्माणात त्यांच्या योगदानासाठी सलामही करतो. परंतु, भारतातील सशस्त्र दले ही अत्यंत समर्पित आणि प्रशिक्षित आहेत. संपूर्ण जगात भारतीय लष्कराची प्रतिष्ठा आहे. परंतु, राहुल गांधी यांच्यासारख्या बेजबाबदार वक्तव्यामुंळे आपल्या मातृभूमीच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

१९६२ मध्ये चीनविरोधात दारुण पराभव पत्करण्यासाठी कारणीभूत नेहरूवादी स्वप्नाप्रमाणे हे वक्तव्य असल्याचे सांगून या निवेदनात म्हटले आहे की हे वक्तव्य म्हणजे नादानपणा आहे. भावी पिढ्यांवर त्याचा भ्रामक प्रभाव होऊ शकतो. त्यामुळेच आम्ही वास्तव काय आहे ते सांगू इच्छितो. भारतीय लष्कर, नौसेना आणि हवाई दलाला अनावश्यक म्हटल्यामुळे गणवेशधारी सैनिकांचे मनोबल खच्ची होऊ शकते. देशाच्या सशस्त्र बलांसाठी ही अपमानजनक गोष्ट आहे. सैन्यदले राष्ट्राच्या अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देण्यापासून कधीही मागे हटत नाही. परंतु, अशा प्रकारच्या वक्तव्यांनी त्यांच्या मनौधैर्यावर परिणाम होऊ शकतो.

राहुल गांधी यांनी या वक्तव्यावर माफी मागावी. लष्करातील बहादूरांकडे आपला माफीनामा द्यावा. त्याचबरोबर भविष्यात लष्कराबाबत विवेकाने वक्तव्य करेन अशी हमी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. भारतीय लष्करातील २० दिग्गज माजी अधिकाऱ्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत. यामध्ये मेजर जनरल जीडी बख्शी, मेजर जनरल पीके सहगल, वाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा, एयर वाइस मार्शल पी के श्रीवास्तव, लेफ्टिनेंट जनरल गुरमीत सिंह, वाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा, एयर मार्शल एस पी सिंह, एअर मार्शल पीके रॉय, एअर मार्शल आरसी बाजपेई,लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, लेफ्टनंट जनरल अरविंद शर्मा, लेफ्टनंट जनरल अरुण साहनी,लेफ्टनंट जनरल हिमालय सिंह, लेफ्टनंट जनरल अशोक कुमार चौधरी, लेफ्टनंट जनरल के एच सिंह, लेफ्टनंट जनरल नितिन कोहली, मेजर जनरल ध्रुव कटोच, मेजर जनरल एस.पी. सिन्हा, मेजर जनरल संजय सोई,मेजर जनरल एस.एन.कशिद,मेजर जनरल एस के कालरा, एयर मार्शल पी.के. श्रीवास्तव यांचा समावेश आहे.

Senior Army officials angry over Rahul Gandhi’s statement

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती